मुंबई : 11 ऑस्कर पुरस्कार मिळविणारा हॉलीवूड चित्रपट ‘टायटॅनिक’ ला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. १९ डिसेंबर १९९७ रोजी रिलीज झालेला हा चित्रपट त्या काळातला सर्वाधिक महागडा चित्रपट ठरला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी अवतार तसेच द टर्मिनेटर सारखे चित्रपट बनविले आहेत. या 15 एप्रिल 1912 साली ‘टायटॅनिक’ जहाज नॉर्थ अॅटलांटिक ओशनमध्ये एका हिमनगाला धडकून बुडाले होते. त्यावर सिनेमा तयार करताना अनेक विक्रम झाले होते. या चित्रपटाने कमाईचेही सर्व विक्रम तोडले होते.
या चित्रपटाची नायिका रोझ ( केट विंसलेट ) हीला जीवदान देण्यासाठी नायक जेम्स ( लिओनार्डाे डिकाप्रिओ ) याला मरताना का दाखविल्याने दिग्दर्शकावर टीका झाली होती, परंतू दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी पाण्यावर तरंगणाऱ्या लाकडी दरवाजाचा आम्ही ‘फोरेन्सिक’ अभ्यास केला होता. आणि तो दोघांचे वजन पेलण्यास सक्षम नव्हता असा दावा केला आहे.
या एपिक आणि रोमँटिक ट्रॅजिडी चित्रपटाचे बजेट खऱ्या टायटॅनिक जहाजाच्या किंमतीच्या 26 टक्के जादा होते. या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी अगदी हुबेहुब ‘टायटॅनिक’ जहाज तयार करण्यासाठी खऱ्या जहाजाच्या ब्लूप्रिंट पाहून रिप्लिका तयार केली होती. तसेच कार्पेटपासून ते फर्निचर त्याच कंपन्याकडून तयार केले होते, ज्यांनी खऱ्या ‘टायटॅनिक’ जहाजाच्या वस्तू तयार केल्या होत्या.
जहाज बुडताना दाखविण्यासाठीच्या एका सिनमध्ये 1 करोड़ लिटर पाण्याचा वापर केला होता. 3 तास 10 मिनिटांच्या या चित्रपटाला 200 मिलियन डॉलर म्हणजे 1250 कोटी रुपये खर्च करून तयार केले होते. प्रत्येक मिनिटाला 8 कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला. त्यामुळे डायरेक्टर आणि डिस्ट्रीब्यूटर दरम्यान खूप वाद झाले होते.
या चित्रपटाची स्टोरी घेऊन जेव्हा दिग्दर्शक जेम्स कॅमेरून 20 सेंचुरी फॉक्स स्टूडियोकडे गेले,तेव्हा त्यांनी स्टूडियोकडे जहाजाच्या असली फूटेज अंटार्टीका समुद्रातून शोधण्यासाठी पैसे मागितले. ज्या पैशांतून ते नकली जहाज बांधणार होते, त्यात 30% बजेट वाढवून टायटॅनिकची फूटेज शोधण्यासाठी बजेट तयार केले गेले. त्यासाठी एकूण 12 रिस्की डाइविंग करण्यात आल्या.
हा चित्रपट दोन तासांचा असावा तरच जास्त शो होऊन जादा कमाई होईल असे निर्मात्यांचे म्हणणे होते. तर तीन तासांच्या सिनेमावरच दिग्दर्शक ठाम राहिले, जर असे केले नाही तर मी जीवंत राहणार नाही अशी धमकीच दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी दिली होती. या चित्रपटातील अनेक पात्रे खरी होती. अखेर या चित्रपटाने सर्व बाबतीत अनेक विक्रम केले.