मुंबई : कर्तव्य बजावणाऱ्या (Traffic Police) वाहतूक पोलिसांबरोबर वाहनधारकांची झालेली हुज्जत ही आपण अनेकवेळा पाहिली असेल. पण (Kharghar Police) खारघरमध्ये वेगळाच प्रकार समोर आला आहे. विरुध्द दिशेकडून येणाऱ्या (Action against vehicles) वाहनांवर कारवाई करीत असताना एका कार चालकाने वाहतूक पोलिसाला चक्क 800 मिटर ते देखील गाडीच्या बोनेटवर बसवत फरपटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. केवळ कारवाईमुळे वाहनधारकाने हे टोकाचे पाऊल उचलले. या सर्व प्रकाराची मोबाईल शूटींग केल्याने समोर आला आहे. खालघर वाहतूक शाखा परिसरात ही घटना घडली आहे. संबंधितावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
खारघर पोलीस वाहतूक अंमलदार नामदेव गादेकर हे नेहमीप्रमाणे कोपरा ब्रीज येथे कर्तव्य बजावत होते. या ब्रीजवर विरुध्द दिशेने येणाऱ्या वाहनांवर ते कारवाई करीत होते. याच दरम्यान, विरुध्द बाजूने MH-46, BZ 6296 ही होंडाई कंपनीची कार भरधाव वेगात आली होती. त्यामुळे गादेकर यांनी थांबण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारवाईच्या धास्तीने वाहनचालकाने कार थांबवलीच नाही. डिमार्ट कडे रोड जाणाऱ्या कोपरा ब्रीज ते स्वर्णा गंगा ज्वेलरी शॉप खारघर या ठिकाणा पर्यंत गाडीच्या बोनेट वर टांगून गादेकर यांना फरपटत नेले.
Today I came across this horrific incidence in Kharghar. No matter what it is very inhuman to treat a traffic police like this.@CMOMaharashtra @Navimumpolice @MumbaiPolice @DGPMaharashtra pic.twitter.com/kLPhmTPG1w
— Dr Janhavi patil (@DrJanhavipatil) July 9, 2022
घडलेला प्रकार निदर्शनास येताच कोपरा ब्रीजच्या बाजूला कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस नाईक निवृती भोईर यांनी रनिंग करून त्या गाडीचा पाठलाग केला. एवढेच नाहीतर त्यासाठी त्यांनी एका कार चालकाची मदत घेऊन त्या संबंधित होंडाई कारला गाडी आडवी घातली. संबंधितावर कारवाईची प्रक्रिया ही सुरु आहे. खारघर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
संबंधित होंडाई कार चालकाला पकडण्यासाठी पोलीस नाईक भोईर यांनी ज्यांना मदत मागितली त्या कारमधील डॉ. जान्हवी पाटील यांनी सर्व घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आहे. त्यामुळे घटनेतील आरोपी कोण आहे हे लवकरच समोर येईल. पण केवळ कारवाई होईल म्हणून असे टोकाचे पाऊल उचलणे कितपत योग्य असा सवाल उपस्थित झाला आहे.