मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी देशातील सर्व विरोधक एकत्र आले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे इंडिया आघाडीचं नेतृत्त्व करत आहेत. इंडिया आघाडीसमोर जागा वाटपाचं मोठं आव्हान असणार आहे. अशातच ठाकरे गट महाराष्ट्रातील किती लोकसभा जागांवर निवडणूक लढणार आहे? याबाबत ठाकरे गटाची मुलुखमैदानी तोफ संजय राऊत यांनी थेट आकडाच जाहीर केला आहे.
उद्धव ठाकरे दिल्लीत गेले तेव्हा राहुल गांधी, सोनिया गांधी ,खर्गे आम्ही एकत्र बसून चर्चा केली आहे. त्या चर्चेत काय घडलं ते लाच माहिती आहे जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात नाही दिल्लीत त्याची चर्चा होईल, आम्ही 23 जागा लढू. प्रकाश आंबेडकर यांची देखील चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे ,ते महाविकास आघाडी इंडिया आलायन्स मध्ये असावेत,साअसं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना राऊतांनी अयोध्येतील राराम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरूनही निशाणा साधला आहे.
शिवसेनेला निमंत्रण नाही, उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही. बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्यांनी निमंत्रण दिलं नसतं. कारण हे श्रेय घेण्याचं राजकीय चढाईचा भाग बनला आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळा आयोध्या मध्ये राम मंदिर बनना शिवसेनेचे मोठं योगदान आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे देखील योगदान मोठ आहे. आम्हाला ते बोलणार नाही उद्धव ठाकरे त्या ठिकाणी गेले तर बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा जयजयकार होईल. ज्यांचे योगदान आहे त्यांना सन्मानाने कधीच बोलणार नाही. प्रभू श्रीराम हे सर्वांचे आहेत ते एका राजकीय पक्षाचे किंवा नेत्याची जहागीर नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील जागावाटप कशा प्रकारे होतं हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकसभेच्या 48 जागांसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.