मुंबई : आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकरणी सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आरेत एका रात्रीत झाडांची कत्तल (Aarey tree cutting) करण्यात आली. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आरे कॉलनीतील जवळपास 400 झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली. आरेमध्ये झाडे कापायला सुरुवात झाली हे कळताच पर्यावरण प्रेमीनी आरे कॉलनीत धाव (Aarey tree cutting) घेतली. पर्यावरणी प्रेमींना आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास विरोध केला असता, अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या सर्व गोष्टीमुळे आरे परिसरात रात्रभरापासून तणावाचे वातावरण आहे.
आरे जंगल परिसरात प्रस्तावित मेट्रोचं कारशेड होणार आहे. त्यासाठी जवळपास 3 हजार झाडे तोडण्यात येणार आहेत. त्याला पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. निसर्ग वाचला तर माणूस वाचेल या संकल्पनेने पर्यावरणप्रेमी आपआपल्या पद्धतीने विरोध करत आहे.
स्वदेशी मूव्हमेंट या संस्थेच्या यूट्यूब चॅनेलवर एक रॅप साँग (SAVE AAREY FOREST RAP SONG) अपलोड करण्यात आलं आहे. हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच गाजतंय. वारली आदिवासी थीमवरील (SAVE AAREY FOREST RAP SONG) या गाण्यात माणसाची जीवनपद्धती, त्याचं मूळ, निसर्ग, भौतिक सूख, अशा सर्वांवर प्रकाशझोत टाकला आहे.
माणूस म्हणुनी जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं, अरे आज नाही उदयाला मरायचं मग कशाला मागं सरायचं, असं म्हणत सेव्ह आरेचा नारा या गाण्यातून दिला आहे.
VIDEO:
Lyrics :
MC MAWALI aka अखिलेश सुतार :
मी तो वारली आदिवासी
आमच्या पद्धती आहेत ऐतिहासिक
ह्या रानाचा मूळ निवासी
जीव आणतो पडसर मातीत
प्राण हिरवा माझा देव आहे वाघोबा
प्रगती तुमच्या बाद आमच्या जंगलातनं माग व्हा
पैसा किती दाखवाल? भौतिक सुखाचे चाकर व्हाल भविष्य तुमचे हाय लबाड
मी जगतो हाय तो वर्तमान
प्रगतीचे तुमचे ढोंग
पहातर पैसे छापतंय कोण
झाडे आमची कापतंय कोण नि
जंगलात मेट्रो मागतंय कोण ?
झाले आहे जगणे दुःख हे
पिंजऱ्यात घालता जनावर मुके
केले मालमत्ताचे तुकडे
पाहुना देत तुम्हा आकाश मोकळे
गोडबोले नेता ते सोंगाडे, आदिवास्यांचे घर म्हणे झोपडे
चोंबडे तर लबाड बोंबले
स्वय खिशा मध्ये रोकडा कोंबले
सहू आम्ही का तुमची तुडवनी
पाहू तरी किती तुमची फसवणी
निशी दिनी आम्हा देता अशांती आत्ता ओढतो माती कपाळतटी. धरीन बाण मी होईन रानटी यातायात मग येईल क्रांती
भीत ना तुला मी तिलका मांझी हासी हासी चडवो फासी
प्रकाश भोईर :
माणूस म्हणुनी जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं
अरे माणूस म्हणुनी जगण्यासाठी आम्हाला सारं हे करायचं
अरे आज नाही उदयाला मरायचं मग कश्याला मागं सरायचं
अरे आज नाही उदयाला मरायचं मग कश्याला मागं सरायचं
MC TODFOD aka धर्मेश परमार :
हमें ना पसंद ये खोटा विकास, ना है तुम जैसे चोरों पे विश्वास मेट्रो बनाने उखाड़ो तुम झाड़ जब झाड़ ना बचेंगे कैसे लोगे सांस
घर मेरा जंगल खुला आकाश, तुम आये त्रास देने करने इसका नाश प्रकृति का बनाओ मज़ाक यही प्रकृति से बनी मानव जात
तुम आज रहे हो हमे भगा, छिनके हमसे तुम हमारी जगह
बस बचा है ये जीने का तरीका, हम वो भी छिनके करने हमें तबाह
सज़ा पक्षी प्राणी की है क्या? क्यों इन्हे बेदखल कर रहे ऐसा?
उद्योगी सरकार हमें रहे फ़सा, हमें वटा के ये बना रहे पैसा
और बसा रहे भलती सोच, भविष्य में इनके बच्चे देंगे इन्हे दोष पर अफ़सोस वो ना देख सकेंगे वो, सहते हुए अपने अगले पीढ़ी को
खुद तुम जीओ और जिनेदो, लगाओ पौदे जब तक जीवित हो
मूर्खो उठो अपनी सोच बदलो या ना कुछ बचेगा फिर खोनेको, जीनेको एक ही हे प्राण उसकी भी कागज़ में तुम मांगो पहचान आदिवासी हु गरीब इंसान कैसे साबित करू मेरा है ये स्थान
मै किसान उगावु अनाज और हर प्राणी मेरे परिवार समान
खुद पे करो तुम बस एक एहसान बचालो अपनी ये सोने की खाण
प्रकाश भोईर :
गाव शेजारी पडीक रान, पिकवलं आदिवाश्यान गाव गुंड हरामखोरांन त्याची केली आदुळदान
जर का गुन्हा केला पुन्हा त्याला तेथेच गाडायचं
अरे आज नाही उदयाला मरायचं मग कशाला मागं सरायचं
अरे आज नाही उदयाला मरायचं मग कशाला मागं सरायचं
100RBH aka सौरभ अभ्यंकर :
जंगली जंगली जंगली
जंगली जिंदगी पाहिजे आम्हाला जंगली खावाले जंगली पावर. मातीची लेकरं मायीशी जुळून दोस्त आणेवाले आहे जनावर
हुकुरुकुकु म्हटल्या बरोबर एका आवाजावर सारे अंगावर. तुम्हाला तर लोक म्हणते मालक पाठी मागं किती गंदी हालत
मंत्री नंदी सारखे डोलत गुलाम बनून राजाचा थाट. आदेश देते कि जंगलाला काप
लावला तर नय ये कोणाचा बाप
सिमेंट चे मजले टाकाले भोपळे
तरी भी पाहिजे छमिया नाच
या जंगलात, एकीने नाचतो धरून साऱ्यांचे हातात हात
तारपा ढोल वारली बोल वाजते नाचते या जंगलात
बायको पोरं हार्डकोर बहीण भावा सारखा समाज
निसर्गाच्या रंगानं जगात फेमस आमचा वारली आर्ट
स्वतःच्या घरानं अन्न बनवतो नाही हो आम्ही कोणाचे गुलाम
गाड्या मोटार सवयी तुमच्या इंधनाची तुम्ही करा तबाही कारखाने देते झेहरीला धुआ
आणि तरंगते ढगांची काळी मलाई
बंदुका मारायला पैसा पण जनतेच्या भुकेचा इलाज केला नाय
इतिहास देते साक्ष वारली कधीभी भुकेनं मेला नाय
प्रकाश भोईर :
अरे देशभक्त लोक तुम्ही नां त्याग आम्हा काय मागता?
देशभक्त लोक तुम्ही नां त्याग आम्हा काय मागता?
अरे जंगल असे आमची आई रक्षणात जीव जाई..रक्षणात जीव जाई..रक्षणात जीव जाई
जंगल असे आमची आई रक्षणात जीव जाई..रक्षणात जीव जाई..रक्षणात जीव जाई
झाड तुम्ही तोडून टाकता त्याग आम्हा काय मागता ?
अरे देशभक्त लोक तुम्ही नां त्याग आम्हा काय मागता
डोळ्यांदेखत उजेड चोरितां त्याग आम्हा काय मागता
त्याग आम्हा काय मागता ..
त्याग आम्हा काय मागता …
अरे त्याग आम्हा काय मागता …