मुंबई : अतिविराट मोर्चाला गावागावातून महाराष्ट्राचे कार्यकर्ते आलेले आहेत. या मोर्चाला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना डिसमीस केलेलं आहे. राज्यपालांना डिसमीस करणारा हा मोर्चा आहे.असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. मुंबईत मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते. ते म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांचा अपमान करण्यात आला. यानंतरही काही लोकं अशाप्रकारचा अपमान करून सत्तेत बसलेले आहेत. या लोकांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही.
हे सरकार उधळून टाकण्यासाठी दिलेला हा इशारा आहे. पाहा या व्यासपिठावर आज दिल्लीसुद्धा दुर्बिणीतून बघत असेल. महाराष्ट्राची ताकत काय आहे. आज महाराष्ट्र जागा झालाय. आज महाराष्ट्र पेटलाय. महाराष्ट्राला ठिणगी पडली, असंही राऊत यांनी सांगितलं.
या मोर्चात सहभागी होणारा प्रत्येकजण महाराष्ट्र प्रेमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारे मंत्रालयात बसले आहेत. या सगळ्यात मोठा महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्राची ११ कोटी जनता वाट पाहतेय. हे सरकार उधळून टाकण्याची संधी आम्हाला केव्हा मिळेल.
सरकार उधळून टाकण्यासाठी लावलेलं पहिलं पाऊलं म्हणजे हा मोर्चा आहे. राज्यात आणि गावागावात राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी संजय राऊत यांनी दिला.
महाराष्ट्राचा रंग एक झाला आहे. शिवसेनेचा भगवा आहे. तिरंगा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी आणि हा समोरचा जनसमुदाय हा रावण गाळण्यासाठी इथं आला आहे, असंही राऊत म्हणाले.