मुंबई : पावसाची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांच्या कानात कालपासून नुसतचं वारं घोंघावतयं… परंतू ढगांशी झुंझणारा वारा असला तरी ढगांच्या दाटी ऐवजी कडकडीत ऊन पडल्याने मुंबईकर हिरमुसले आहेत. परंतू घामाने भिजलेल्या मुंबईकरांच्या प्रतिभेला मात्र याही वातावरणात अक्षरश: धुमारे फुटल्याचे समाजमाध्यमावर दिसत होते. विकेण्डला तरी पावसाच्या धारा कोसळून उकाडा आणि काहीलीपासून काही तरी दिलासा मिळेल असे वाटले होते. परंतू बिटरजॉय चक्रीवादळ ( Biparjoy ) पुन्हा गुजरातकडने गेल्याने पश्चिम रेल्वेवर ( WesternRailway ) मात्र वैतरणा पुलावर ( Vaitarna ) ओव्हरहेड वायरचा मास्ट कोसळून लोकलची ( Mumbai Local ) वाहतूक विस्कळीत झाली.
Mumbaikar’s since today morning waiting for sky to get cloudy-#MumbaiRains pic.twitter.com/CMMAffxLPy
— Vishal Gopal Mishra (@Vishal_3250) June 10, 2023
एरव्ही मुंबईत 6 जूनला हटकून येणारा पाऊस यंदा 10 जून उजाडला तरी पावसाचा काही पत्ता नसल्याने मुंबईकर कातावले आहेत. यंदा अल- निनोचा प्रभाव असल्याने मान्सूनच्या प्रमाणावर काही फरक होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याने वर्तविलेला सरासरी पावसाचा अंदाज त्यामुळे चुकतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. केरळात पावसाचा 1 जूनला होणारा शिरकाव यंदा लांबला असल्याने पावसाचे मुंबईतले आगमनही लांबले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना घामाच्या धारांमध्ये आणखी किती दिवस भिजावे लागतेय हे आता मान्सूनच्या आगमनावरच अवलंबून आहे.
#MumbaiRains pic.twitter.com/DqCtWoPUw2
— Soumya (@bytesofnews) June 10, 2023
राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने गेले काही दिवस दिलासा दिला असला तरी मुंबईत काही पाऊसाचा काही पत्ता नसल्याने चटके देणाऱ्या कडक उन्हाचेच काही दिवस दर्शन होत आहे. त्यात हवामान खात्याने कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊन मान्सून लांबणार असे भविष्य वर्तविले होते.
Very severe cyclonic storm #Biparjoy at 2330 hrs IST of 9th June over east-central Arabian Sea near lat 16.0N & long 67.4E. Likely to intensify further & move north-northeastwards during the next 24hrs: IMD pic.twitter.com/pAVvo3n460
— ANI (@ANI) June 9, 2023
समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा मुंबई आणि कोकण किनारपट्टीला 48 तासांत बसणार असे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. चक्रीवादळाच्या आगमनाने महाराष्ट्रातील किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग प्रचंड वाढल्याने मुंबईत डोक्यावर कडक ऊन्हं, परंतू कानात घोंघावतंय वारं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर सोशल मिडीयावर ट्वीटर आणि फेसबुकवर अनेक मजेशीर मिम्स फिरत आहे. मुंबई रेन #MumbaiRains नावाने ट्वीटरवर ट्रेंडच सुरू आहे.
#MumbaiRains pic.twitter.com/b1LhWuE84k
— Radz Talking (@throwball) June 10, 2023