जगातलं सर्वात मोठ्ठं विमान.. जणू व्हेल मासा.. मुंबई विमानतळावर उतरलं.. पाहा Video

| Updated on: Nov 23, 2022 | 11:23 AM

मुंबई विमानतळावर एअरबस बेलुगा सुपर ट्रान्सपोर्टर या विमानाचे आगमन झाले.

जगातलं सर्वात मोठ्ठं विमान.. जणू व्हेल मासा.. मुंबई विमानतळावर उतरलं.. पाहा Video
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सुनिल काळे, मुंबईः जगातलं सर्वात मोठं विमान (World’s Big Airoplane) कसं दिसतं, त्याची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत, हे पाहण्याची संधी भारतीयांना मिळाली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी संध्याकाळी उतरले. ‘एअरबस बेलुगा’ (Airbus Bulega) असं विमानाचं नाव आहे. विमानाचे डिझाइन व्हेल माशासारखे (Whale Fish) आहे. मात्र हे प्रवासी विमान नसून मालवाहू विमान आहे. 51 टन मालवाहू क्षमतेचं आहे. या विमानाची दृश्य आणि फोटो नुकतेच व्हायरल झाले असून सोशल मीडियावर ते वेगाने शेअर केले जात आहेत.

या विमानाची छायाचित्र विमान प्राधिकरणाने ट्विटरवर शेअर केली. अधिकाऱ्यांनी लिहिलंय… मुंबई विमानतळावर एअरबस बेलुगा सुपर ट्रान्सपोर्टर या विमानाचे आगमन झाले. याच्या अत्यंत युनिक अशा डिझाइनबाबत तुम्हाला काय वाटतं…

हवाई दलातील अनेक उत्साहींनी या विमानाचे फोटो आपापल्या साइटवर शेअर केले. या विमानाचे डिझाइन व्हेल माशासारखे आहे.

विमानाच्या कॅरिअरची लांबी 56 मीटर आणि उंची 17 मीटर एवढी आहे. रविवारी हे विमान कोलकाता विमानतळावर होते. तिथे इंधन भरण्यासाठी तसेच क्रू सदस्यांच्या विश्रांतीकरिता हे विमान थांबले होते.

E2 फॅमिलीतील E195-E2 हे विमान नुकतेच मुंबई विमानतळावर उतरले. विमानतळावर काही माल उतरवल्यानंतर हे विमान निघून गेले.

यापूर्वी जगातील सर्वात मोठं विमान म्हणून कार्गो एअरक्राफ्ट Antonov AN-225 किंवा म्रिया या नावाने ओळखलं जात होतं. पण रशिया-युक्रेन युद्धात ते नष्ट झालं. आता अशा विशाल आकाराचे एअरबस बुलेगा हेच विमान आहे.

 

एअरबस बुलेगा हे विमान व्हेल माशासारखे दिसते. रशियात व्हेलला बुलेगा असे म्हणतात. अंतराळात स्पेस शटल नेण्यासाठी सुपर गप्पी नावाचे एक महाकाय विमान तयार १९९५ मध्ये तयार करण्यात आले होते. सुपर गप्पी विमानाला पर्याय म्हणून एअरबस बुलेगा हे विमान तयार करण्यात आले होते.

या विमानाची रेंज 40 टन वजनाला 2,779 किलोमीटर आणि 26 टन वजनाला 4,632 किलोमीटर एवढी आहे. तर विमानाची इंधन क्षमता, 6,303 यूएस गॅलन एवढी आहे. विशेष म्हणजे या विमानासाठी फक्त दोन क्रू सदस्यांची गरज आहे. विमान 184 फूट 3 इंच एवढे लांब आहे.