मुंबई : दादरमधील सेनाभवनासमोर असलेल्या दुधाच्या दुकानात चोरट्यांनी डल्ला मारला. दुकान फोडून 15 हजारांपेक्षा अधिक रक्कम लंपास झाल्याची माहिती आहे. (Theft in Milk Centre in Main Chowk of Mumbai Dadar Sena Bhavan)
मुंबईतील मध्यवर्ती दादर भागात शिवसेना भवन आहे. सेनाभवन आणि पोलिसांच्या बिट चौकीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हे दूध विक्री केंद्र आहे. या दुकानात रात्रीच्या वेळेस चोरी झाल्याचे समोर आले आहे.
चोरट्यांनी दुधाच्या दुकानाचा लाकडी दरवाजा तोडला. दुकानात ठेवलेली जवळपास 15 हजार रुपयांची रक्कम चोरण्यात आली.
मुंबईत अनलॉक सुरु असलं तरी चोरीच्या घटना वाढताना दिसत आहेत. दादरमधील मुख्य चौकात, सेनाभवन आणि पोलिसांच्या बिट चौकीसमोर हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलीस यंत्रणा फक्त नेत्यांना सुरक्षा देते का? सर्वसामन्य नागरिकांना सुरक्षेची हमी कधी देणार असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.
VIDEO : टॉप 9 न्यूज | 18 August 2020 https://t.co/vFu4QjPDal
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 18, 2020