मुंबई : सावरकर किती वीर होते. इंग्रजांकडून पेन्शन घेत होते. काँग्रेसच्या विरोधात इंग्रजांसोबत काम करत होते. सावरकर यांनी पत्र लिहिले नि सावरकर इंग्रजांचं काम करू लागले, अशी टीका राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केली. राहुल गांधी हे सावरकर यांच्याबद्दल असंचं बोलू लागले, तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.
संजय राऊत म्हणाले, भारत जोडो यात्रा ही हुकुमशाहीच्या विरोधात निघाली आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार अशा विषयांवर भारत जोडो यात्रा सुरू आहे. त्यामुळंचं या यात्रेला महाराष्ट्रात सर्वात जास्त समर्थन मिळालं.
मग वीर सावरकर यांचा विषय काढण्याची आवश्यकता नव्हती. यामुळं महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असा इशाराचं संजय राऊत यांनी दिला. कारण आम्ही वीर सावरकर यांना श्रद्धास्थान मानत आहोत. याच राऊतांनी महाविकास आघाडीसाठी पुढाकार घेतला होता. आता तेच संजय राऊत हे सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसला इशारा देत आहेत.
त्यामुळं राऊत यांचे हे विधान महाविकास आघाडीसाठी फार महत्त्वाचं आहे. २०१९ च्य निकालानंतर अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेनं भाजपची साथ सोडली. शिवसेनेनं काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडी स्थापन केली.
महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून संजय राऊत यांची ओळख आहे. शरद पवार यांच्या मदतीनं संजय राऊत यांनी महाविकास आघाडीची मोट बांधली.
गेली तीन महिने राऊत जेलमध्ये होते. बाहेर आल्यानंतर ते पुन्हा एकदा सक्रिय झालेत. सावरकर यांच्या राहुल गांधी यांच्या टीकेवरून ठाकरे गटालाचं भाजप अडचणीत आणते. भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली. त्यानंतर ठाकरे गटाचा राऊतांकडून मेसेज देण्याचा प्रयत्न करण्यात आला.