मुंबई : काही प्रश्नावर मतभेद असू शकतो. सावरकरांच्या मुद्दयांवर आमची चर्चा झाली आणि त्यातून आम्ही मार्ग काढला. चर्चेतून मार्ग निघू शकतो, असं मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं. सावरकरांच्या मुद्यांवर मतभिन्नता असू शकते. असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. देशासमोर बेरोजगारी, महागाई यासारखे महत्त्वाचे विषय आहेत, असंही ते म्हणाले.
19 विरोधी पक्ष एकत्र आलेत. पण, त्यांना जेपीसीत स्थान मिळणार नाही. जेपीसी म्हणजे ज्यॉइंट पार्लमेंट्री कमिटी. या कमिटीत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाचे लोकं राहतात. विरोधी पक्षाला फार कमी महत्त्व दिलं जातं.
मी जेपीसीऐवजी सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक योग्य असल्याचं सांगितलं. मी जेपीसीला विरोध करत नाही. काही जेपीसींचा मीसुद्धा चेअरमन होतो. पण, जेपीसीत बहुमताच्या मुद्यावर पारदर्शकता निर्माण होईल, याची शास्वती नाही, असंही पवार म्हणाले.
देशात दुग्धजन्य पदार्थांची कमतरता होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आम्ही आयात करायचा विचार करू. असं सचिव म्हणाले. माझ त्यात एकच म्हणण आहे. आयात करण्याची गरज नाही. उत्पादक शेतकऱ्याला चांगली किंमत द्या. उत्पादन या देशाचा शेतकरी करेल.
अजित पवार नॉट रिचेबल असल्याचं पत्रकारांनी विचारलं. यावेळी मला माहीत नसल्याचं शरद पवार म्हणाले. नॉट रिचेबल म्हणजे काय, असंही पवार म्हणाले.
२० हजार कोटींची माझ्याकडे आकडेवारी नाही. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या २० हजार कोटींच्या आरोपावर दिली.२०२४ ला मोदी यांना हटवण्याच असेल तर विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. या विषयावर आमची बैठक झाली आहे. बैठकीत आम्ही आपलं म्हणण मांडलं.
सावरकर यांच्या मुद्यांवरून वाद सुरू आहे. भाजपने गौरव यात्रा काढली. राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपने हा निर्णय घेतला. सावरकर यांच्या बाबत मतभिन्नता असू शकते, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.