मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. विविध मागण्यांसाठी मुंबईतील जवळपास 30 हजार 500 कर्मचारी 7 जानेवारी पासून संपावर गेले. लोकल प्रमाणे बेस्ट देखील मुंबईची लाईफलाईन समजली जाते. दररोज लाखो प्रवासी बेस्टने प्रवास करतात. मात्र गेल्या दोन दिवसांपासून संपांमुळे मुंबईच्या रस्त्यांवर शुकशुकाट आहे. या संपामुळे दररोज बसने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे मात्र हाल होत आहेत. दुसरीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये वीजपुरवठा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मात्र संपावर तोडगा न निघाल्यास बेस्टचे वीजपुरवठा कर्मचारीही संपावर जाण्याच्या तयारीत आहे. जर हे कर्मचारी संपावर गेले तर मुंबई अंधारात असेल.
LIVE UPDATE
संबंधित बातमी – संप मिटल्यावर बुके द्या, एकत्र राहा, राज यांचा बेस्ट कर्मचाऱ्यांना सल्ला
दरम्यान, बस नसल्याने प्रवाशांना टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे. मात्र अनेक ठिकाणी हे टॅक्सी चालक संधीचा फायदा घेताना दिसून येत आहेत. संप असल्याने मुंबईकरांना प्रवास करण्यासाठी इतर पर्यायी व्यवस्थेचा वापर करावा लागत आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटीच्या काही बस सोडण्यात येत आहेत, तर जास्तीच्या लोकलही सोडण्यात येत आहे. तरीही अनेकांना टॅक्सीचा आधार घ्यावा लागत आहे. प्रवाशांच्या या मजबुरीचा फायदा घेत टॅक्सी चालक त्यांच्याकडून मनमानी पैसे घेत आहेत. मीटरने न जाता वाट्टेल तेवढे पैसे हे टॅक्सी चालक प्रवाशांकडून लुटत आहेत.
मुंबईच्या टॅक्सीचालकांची ही मनमानी काही नवीन नाही. काही महिन्यांपूर्वी जेव्हा ओला-उबर टॅक्सी चालकांनी संप पुकारला होता. तेव्हाही प्रवाशांकडून अशाच प्रकारची लूट करण्यात आली होती. आधीच बसेस नसल्याने प्रवाशांना टॅक्सीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागत आहे, त्यातच वाट्टेल तो भाडं सांगत हे टॅक्सी चालक प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत आहेत.
मुंबईत पाऊस असो, कुणाचं आंदोलन असो किंवा बँकेचा, सरकारी अधिकाऱ्यांचा, बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप असो, यात हाल मात्र मुंबईकरांचेच होतात, हे पुन्हा एकदा दिसून येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत म्हणून हे कर्मचारी संप पुकारतात, मात्र या सर्वांचा सर्वात जास्त फटका हा सामान्य मुंबईकरांना बसतो. दोन दिवसांपासून बेस्ट कर्मचारी संपावर आहेत, संप मागे घेण्यासाठी सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये अनेक बैठका होत आहेत, तरीही मागील दोन दिवसांपासून हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. यातच टॅक्सीचालकांच्या या मनमानी कारभारामुळे मुंबईकर मात्र त्रस्त झाले आहेत, सरकारने लवकरात लवकर हा संप संपवत बस सेवा पुन्हा सुरु करावी अशी मागणी आता मुंबईकर करत आहेत.
* 2007 पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,930 रुपयांनी सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये त्वरीत वेतननिश्चिती करावी.
* एप्रिल 2016 पासून लागू करावयाच्या नवीन वेतन करारावर तातडीने चर्चा सुरू करावी.
* 2016-17 आणि 2017-18 करिता पालिका कर्मचाऱ्यांइतकाच बोनस द्यावा.
* कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न सोडवावा.
* अनुकंपा भरती तातडीने सुरू करावी.
संबंधित बातम्या