मुंबईः महाविकास आघाडीचे सरकार असताना कौशल्य विकास केंद्रासाठी असलेल्या राखीव जागेवर उर्दू भाषा प्रशिक्षण केंद्र स्थापन केले गेल्याने भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. यावेळी आयटीआयच्या जागेवर उर्दू भाषा प्रशिक्षण केंद्र उभा न राहता आयटीआयचंच केंद्र उभा केले जाणार असून हे भाषा केंद्र उभा करायचं असेल तर मातोश्री टूची जागा उपलब्ध आहे. तिथं उभा कराव असा सल्लाही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना दिला आहे.
महाविकास आघाडीवर टीका करताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांची नक्कल करत त्यांनी म्हटले त्यावेळी तुम्ही का ओरडत नव्हता, की रोजगार गेला रोजगार गेला.
त्यामुळे आता, “आम्ही परत परत आठवण करून देतोय की, हे हिंदुत्ववादी सरकार आहे” असं म्हणत त्यांनी ठाकरे गटाला आणि त्यांच्या मित्र पक्षाला ठणकावून सांगितले आहे.
यावेळी भाजपचे नेते नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यासोबतच माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी उर्दू भाषा प्रशिक्षण केंद्र मातोश्रीमध्ये स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी हिंदुत्वाचे समर्थन करत त्यांनी अशा गोष्टीं आम्ही खपवून घेणार नाही असंही त्यांनी सांगितले.
कौशल्य विकास केंद्रासाठी जागा राखीव असताना त्या ठिकाणी मराठी मुलांसाठी रोजगार निर्मितीच काम करण्यात येणार होते. पण महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यावेळी कौशल्य विकास विभागाचे मंत्री नवाब मलिक होते. आणि त्याचवेळी हा उर्दू भाषा प्रशिक्षण केंद्राचा घाट घेतला गेला असल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले.
येथील राखीव जागा रद्द करून, उर्दू भाषा प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले होते, आणि त्याला तात्काळ मान्यताही देण्यात आली होती.
तर त्यासाठी 10 आठवड्यात 12 कोटी रुपये मंजूरही करण्यात आले होते. त्यामुळे कौशल्य विकास रद्द केल्यामुळे येथील मराठी माणसांचा रोजगार गेला होता.
त्यामुळे मराठी माणसांवर होणारा अन्याय हे हिंदूत्ववादी सरकार खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे याविषयावर बोलताना त्यांनी सांगितले की, मी कुठला आमदार म्हणून येथे आलो नाही पण एक हिंदू म्हणून येथे आलो आहे.
त्यामुळे या प्रकारचं कोणतंही प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी उभं राहणार नाही हे ठणकावून सांगत आहे. मातोश्री टू ची जागा आहे तिथं बोर्ड लावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.