हा आहे जगातला सर्वात कमजोर पासपोर्ट

| Updated on: Jan 12, 2023 | 10:54 AM

पॉवर फुल पासपोर्ट कोणत्या अर्थाने ? तुम्ही अडचणीत असाल तर तुम्हाला व्हीसा शिवाय अधिक देशांना भेट ज्या पासपार्टआधारे मिळू शकते, त्याआधारे जगातील ताकदवान पासपोर्टची सूची दरवर्षी तयार केली जात असते.

हा आहे जगातला सर्वात कमजोर पासपोर्ट
PASSPORT
Follow us on

मुंबई : जगामध्ये विमानप्रवासाला प्रचंड महत्व आहे. विमानाने वेगाने देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करता येतो. हा प्रवास करताना व्हीसा ( VISA ) बरोबरच पासपोर्टही ( PASSPORT ) लागत असतो. या पासपोर्टलाही दर्जा असतो. त्यामुळे जगातील विमानतळांवर तपासणी दरम्यान आपल्याला वागणूक दिली जाते. तर पाहू या कोणत्या देशाच्या पासपोर्टचा रँक कितवा आहे ते..

जगामध्ये अनेक देश असे आहेत की त्यांच्या पासपोर्टच्या विशिष्ट दर्जामुळे तो धारण करणाऱ्या व्यक्तींना त्या विशिष्ट देशांमध्ये त्यांना व्हीसा फ्री प्रवेश मिळतो. युद्धाने सतत बेजार झालेला आपला शेजारी देश असलेल्या अफगाणिस्तानचा पासपोर्ट साल 2023 मध्ये जगातला सर्वात विकेस्ट पासपोर्ट ठरला आहे.

हेनले पासपोर्ट इंडेक्सनूसार अफगाणिस्तानच्या पासपोर्टला केवळ 27 देशांमध्ये व्हीसा शिवाय प्रवेश आहे. इतर देशांमध्ये इराकच्या पासपोर्टला 29 देशांमध्ये व्हीसाशिवाय प्रवेश आहे. तर यादवीने त्रस्त असलेल्या सिरीयाच्या पासपोर्टला 30 देशांमध्ये व्हीसाशिवाय प्रवेश आहे.

सध्या आर्थिक दिवाळखोरीने कंगाल झालेल्या आपला शेजारी असलेल्या पाकिस्तानच्या पासपोर्टला 32 देशांमध्ये व्हीसाशिवाय प्रवेश आहे. येमेन (34), सोमालिया (35),नेपाळ (38) आणि उत्तर कोरीया ( 40) अशाप्रमाणे व्हीसाशिवाय मुक्तप्रवेश असल्याचे हेनले पासपोर्ट इंडेक्सने म्हटले आहे.

जपानचा पासपोर्ट जगात सर्वात बलशाली असून त्या देशाच्या पासपोर्टधारकाला तब्बल 193 देशांमध्ये व्हीसाशिवाय मुक्त प्रवेश आहे. सिंगापूर आणि साऊथ कोरीया या देशाचे पासपोर्ट 192 देशात व्हीसाशिवाय प्रवेश देणारे जगात जपाननंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर 190 देशात व्हीसाशिवाय प्रवेश देणारे जर्मनी आणि स्पेन हे दोन देश आहेत.

अफगाणिस्तान खालोखाल इराक, सिरीया, पाकिस्तान, येमेन या देशांचे पासपोर्ट आहेत. हेनले आणि पार्टनर यांनी इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट एसोसिएशन ( IATA ) कडून मिळालेल्या माहितीआधारे 227 ट्रॅव्हल डेस्टीनेशन्स आधारे 199 विविध देशांच्या पासपोर्टची
ही सूची तयार केली आहे. आपल्या भारताच्या पासपोर्टचे या यादीत 85 स्थान असून भारताच्या पासपोर्टला 59 देशात व्हीसाशिवाय प्रवेश मिळत आहे. आता पासपोर्टच्या व्हीसा फ्री प्रवेशानूसार 2023 च्या पहील्या तिमाहीची टॉप टेन यादी खालीलप्रमाणे आहे.

1. जपान
2. सिंगापूर
3. दक्षिण कोरिया
4. जर्मनी
5. स्पेन
6. फिनलंड
7. इटली
8. लक्झेंबर्ग
9. ऑस्ट्रिया
10. डेन्मार्क