शाळा असाव्यात तर अशा! महाराष्ट्रातील 3 शाळांना मिळणार 2,50,000 डॉलर, नेमकं कारण काय?

| Updated on: Jun 19, 2023 | 7:43 PM

या वर्षी भारतातील पाच शाळांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराचं नामांकन मिळालं आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीच्या शाळांचा समावेश आहे.

शाळा असाव्यात तर अशा! महाराष्ट्रातील 3 शाळांना मिळणार 2,50,000 डॉलर, नेमकं कारण काय?
Follow us on

मुंबई : जगभरात मुलांसाठी चांगल्या शैक्षणिक सोयी उपलब्ध होण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक संस्था प्रयत्नशील असतात. भारतातही मुलांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना चांगले शिक्षण देण्याचे प्रयत्न होतात. असे प्रयत्न करणाऱ्या शाळांना विविध पुरस्कार देवून प्रोत्साहन दिले तर समाजात परिवर्तन घडण्यास वेळ लागणार नाही. यासाठीच आंतरराष्ट्रीय सर्वश्रेष्ठ स्कूल पुरस्कार दिले जातात. अशातच जगभरातून निवड झालेल्या शाळांपैकी महाराष्ट्रातील 3 शाळांची निवड झाली आहे.

सामुहिक सहकार्य, पर्यावरण सहकार्य, इनोव्हेशन, प्रतिकूल परिस्थिती सांभाळने आणि निरोगी जीवन जगण्यासाठी प्रयत्न करणे या 5 कॅटेगिरीमध्ये हे आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम स्कूल पुरस्कार दिले जातात. या पुरस्काराचा उद्देश हा विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यात शाळांना प्रोत्साहीत करणे आहे.

पुरस्काराची रक्कम 2,50,000 डॉलर

विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आणि त्यांच्या विकासात हातभार लावणाऱ्या अशा शाळेना तब्बल 2,50,000 डॉलर इतके बक्षीस मिळाले आहे. यावेळी भारतातील पाच शाळेना हा पुरस्कार मिळाला आहे, त्यात महाराष्ट्रातील तीन शाळांचा समावेश आहे.

एजुकेशन एंड द वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइजचे संस्थापक विकास पोटा म्हणाले की, “जगभरातील शाळा या अग्रणी भारतीय शाळांकडून खूप काही शिकू शकतात. या भारतीय शाळांनी विकसित केलेल्या संस्कृतीतून खूप काही शिकण्यासारखे आहे.”

‘या’ भारतीय शाळांचा समावेश

‘नगर निगम प्रतिभा बालिका विद्यालय (NPBV) F-ब्लॉक दिल्ली, रिवरसाइड स्कूल, अहमदाबाद तर महाराष्ट्रातील ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल, मुंबई आणि शिंदेवाडी मुंबई पब्लिक स्कूल (द आकांक्षा फाउंडेशन), तर HIV/एड्स ग्रस्त मुलांची आणि सेक्स वर्करच्या मुलांच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, अहमदनगर यांचा समावेश आहे.

सप्टेंबर महिन्यात होणार टॉप 3 शाळांची घोषणा

जगातल्या सर्वश्रेष्ठ शाळांच्या पुरस्काराची घोषणा सप्टेंबर महिन्यात होणार आहे. यात प्रत्येक श्रेणीमध्ये टॉप तीन शाळांची निवड करण्यात येणार आहे. यानंतर ऑक्टोबर महिन्यात विजेत्या शाळांची घोषणा करण्यात येईल. विजेत्या शाळेंना 2,50,000 डॉलर रक्कम समान रुपात वाटली जाईल. प्रत्येक विजेत्या शाळेला 50,000 डॉलर पुरस्कार मिळणार.

दरम्यान, शालेय जीवन हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचे वळन असते. आई-वडिलांनतर शाळेतील शिक्षकच मुलांसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण करत असतात. शालेय जीवनातील मुलांची प्रगती आणि त्यांच्यावर झालेले संस्कार हे त्याला समाजात वावरण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी शालेय जीवनातील वातावरण खूप महत्त्वाचे असते.