VIDEO : बंदूकबाज बाप, गोळ्या भरलेली रिव्हॉल्वर चिमुकल्याच्या हातात, व्हिडीओ बनवून व्हॉट्सअॅप स्टेटस

| Updated on: Jul 11, 2019 | 1:46 PM

टिटवाळ्यातील ग्रेटर व्हॅली स्कूल ट्रस्टीच्या पतीचा संतापजनक प्रताप समोर आला आहे. चिमुकल्या मुलाच्या हातात जिवंत काडतुसे आणि रिव्हॉल्वर व्हिडीओ शूट करण्यात आला.

VIDEO : बंदूकबाज बाप, गोळ्या भरलेली रिव्हॉल्वर चिमुकल्याच्या हातात, व्हिडीओ बनवून व्हॉट्सअॅप स्टेटस
Follow us on

कल्याण : टिटवाळ्यातील ग्रेटर व्हॅली स्कूल ट्रस्टीच्या पतीचा संतापजनक प्रताप समोर आला आहे. चिमुकल्या मुलाच्या हातात जिवंत काडतुसे आणि रिव्हॉल्वर व्हिडीओ शूट करण्यात आला. धक्क्दायक म्हणजे जिवंत काडतुसे रिव्हॉल्वरमध्ये टाकण्याचं प्रशिक्षण देताना व्हिडिओ शूट करण्यात आला. आदर्श उपाध्याय असं या महाप्रतापी पालकाचे नाव आहे. ते ग्रेटर व्हॅली स्कूलच्या ट्रस्टीचे पती आहेत.

आदर्श उपाध्याय यांनी रिव्हॉल्वहरमध्ये 3 जिवंत काडतुसे टाकून चिमुकल्या मुलाच्या हातात दिली. इतकंच नाही तर हा धक्कादायक व्हिडिओ या पालकाने व्हाट्स अप स्टेटसला ठेवला. त्यानंतर व्हायरल झालेला हा व्हिडीओ  टीव्ही 9 मराठीच्या हाती लागला.

यानंतर टीव्ही 9 मराठीने या पालकाची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावर “मीडियाला मला  प्रश्न विचारण्याचा कोणताही अधिकार नाही.तो माझा मुलगा आहे. हट्ट करत होता म्हणून मी रिव्हॉल्वर हातात दिलं. मी कोणतीही  प्रतिक्रिया देणार नाही. मीडिया माझ्यावर दबाव आणू शकत नाही”, असं या पालकाने सांगितलं.

VIDEO :