[svt-event title=”मुंबईतील तिघांचा नदीमध्ये बुडून मृत्यू” date=”17/06/2019,8:37AM” class=”svt-cd-green” ] रायगड : मुंबईतील तीन तरुणांचा नदीमध्ये बूडून मृत्यू झाला आहे. ही घटना रोहा तालुक्यातील बल्ले गावातील नदीमध्ये घडली. महेश जेजुरीकर (39), अक्षय गणगे (29) आणि परेश जेजुरीकर अशी मृत झालेल्यांची नावं आहेत. [/svt-event]
[svt-event title=”महिला शौचालयात मृत नवजात अर्भक सापडले” date=”17/06/2019,8:24AM” class=”svt-cd-green” ] पुणे : मावळ देहुरोड गांधीनगर येथील महिला शौचालयात स्त्री जातीचे मृत नवजात अर्भक आढळले, अर्भक सापडल्यामुळे परिसरात एकच खळबळ, अज्ञात व्यक्ती विुद्ध गुन्हा दाखल, काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी अर्भक सापडले होते. [/svt-event]
[svt-event title=”मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत” date=”17/06/2019,8:13AM” class=”svt-cd-green” ]
#BREAKING : मध्ये रेल्वे पुन्हा विस्कळीत, ऐन गर्दीच्या वेळेत मुंबईकरांचे हाल, सिग्नल यंत्रणेत बिघाड, ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान बिघाड
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 17, 2019
[svt-event title=”राज्यासह देशभरातील डॉक्टर आज संपावर” date=”17/06/2019,7:31AM” class=”svt-cd-green” ] कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणामुळे राज्यासह देशभरातील डॉक्टर आज संपावर जाणार आहेत. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज (17 जून) संपाची हाक दिली आहे. खासगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर संपावर गेल्यास रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. [/svt-event]