मुंबई | 25 जुलै 2023 : ग्राहक निर्देशांकाचे (Consumer Affair Record) आकडे समोर आले आहे. 23 जुलै रोजी हे आकडे समोर आलेत. त्यानुसार, देशात टोमॅटोची अधिकत्तम किंमत 200 रुपयांपेक्षा खाली आली आहे. तर मुंबईचा विचार करता किरकोळ बाजारात या किंमती 160 रुपये प्रति किलोग्रॅमवर असल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या एका महिन्यात टोमॅटोने सोन्यासारखा भाव गाठला. सोन्याला ही टोमॅटोने दरवाढीत (Tomato Price Hike) मागे टाकले. 25-30 रुपये किलोवरुन टोमॅटोने थेट 300-350 रुपये किलोपर्यंत झेप घेतली. केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याने प्रकरण थोडं निवळले. उत्तर भारतात अनेक ठिकाणी टोमॅटो 70-90 रुपये किलोने विक्री होत आहे. पण टोमॅटोचे उत्पादन होणाऱ्या राज्यातच टोमॅटोने उच्चांक गाठला आहे. गेल्या सात आठवड्यात या शहरात 7 पटीने किंमती वाढल्या. अगोदरच पावसाने झोडपल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण आहते. आता त्यात टोमॅटोने त्यांचा घाम काढला आहे.
मुंबईत टोमॅटोचा रेकॉर्ड
मुंबईत टोमॅटोने किंमतीत नवीन रेकॉर्ड केला. मुंबईत टोमॅटो 200 रुपये प्रति किलोवर पोहचले. किंमतीत वाढ झाल्याने त्याचा खरेदीदारांच्या संख्येवर परिणाम झाला. ग्राहकांची संख्या रोडावली आहे. त्याचा परिणाम ग्राहकांवर झाला. टोमॅटो विक्रीची अनेक दुकाने बंद पडली.
7 आठवड्यात 7 पट दाम
जास्त पावसाने टोमॅटोच्या पिकावर पाणी फेरले. टोमॅटो खरब झाले. तसेच इतर भाजीपाला पण महागले. टोमॅटोच्या किंमती जून महिन्यापासून सातत्याने वाढत आहे. जूनमध्ये टोमॅटोच्या किंमती 30 रुपये प्रति किलो होत्या. 13 जून रोजी किंमती 50-60 रुपयांवर पोहचल्या. जूनच्या शेवटी भाव 100 रुपयांवर गेले. 3 जुलै रोजी टोमॅटोचे भाव 160 रुपये किलोपर्यंत वाढल्या. तर येत्या काही दिवसांत टोमॅटो 200 रुपये किलोवर पोहचणार असल्याची व्यापाऱ्यांची भविष्यवाणी आहे.
यामुळे वाढणार किंमती
TIO ने एक रिपोर्ट दिला. त्यानुसार, एपीएमसी वाशीचे संचालक शंकर पिंगळे यांनी टोमॅटोच्या किंमतींची माहिती दिली. टोमॅटोचा घाऊक दर 80 ते 100 रुपये प्रतिकिलो आहे. पावसाचा तडाखा, रेड अलर्ट, वाहतूक कोंडी, सखल भागात पाणी साचल्याने माल वाशी मार्केटमध्ये पोहचत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे किंमती वधारल्या आहेत. काही दिवसात टोमॅटोचा पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
टोमॅटो 200 रुपयांच्या पुढे
टोमॅटोचा भाव 110 ते 120 रुपये प्रति किलो असल्याची माहिती वाशी मार्केटमधील व्यापारी सचिन शितोळे यांनी दिली. दादर मार्केटमध्ये टोमॅटोचा घाऊक दर 160 ते 180 रुपये प्रति किलो असल्याची माहिती भाजी विक्रेता रोहित केसरवानी यांनी दिली.
या मार्केटमध्ये पण दरवाढ
खार मार्केट, पाली मार्केट, वांद्रे, दादर मार्केट, माटुंगा, फोर बंगलोज, अंधेरी, मालाड, परळ, घाटकोपर आणि भायखाळामध्ये पण टोमॅटोचा दर वाढलेला आहे. विक्रेत्यांनी टोमॅटोचा भाव 200 रुपये प्रति किलो सांगितला. घासघीस केल्यावर अनेक ठिकाणी टोमॅटो180 रुपये प्रति किलो विक्री होत असल्याचा दावा करण्यात येत आहे.