या मोर्च्याची आठवण करून देणारा उद्याचा मोर्चा असेल, संजय राऊत यांनी केलं आवाहन

| Updated on: Dec 16, 2022 | 5:24 PM

या सर्वांच्या विरोधात महाराष्ट्र प्रेमी उद्या एकवटणार आहेत. त्यामुळं या मोर्च्याला अडथळे आणण्याचा प्रश्नचं येत नाही, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

या मोर्च्याची आठवण करून देणारा उद्याचा मोर्चा असेल, संजय राऊत यांनी केलं आवाहन
संजय राऊत
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडीच्या वतीनं उद्या मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय.सरकारमधल्या महाराष्ट्र प्रेमींनी उद्याच्या मोर्च्यात व्हावं. महाराष्ट्रावरील निष्ठा दाखविली पाहिजे, असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी केलं. महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेचा बुलंद आवाज उद्या दिसणार आहे. राजभवनात बसून असून, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करावा, हे कुणालाही मान्य नाही. घटनात्मक पदावर बसून सावित्रीबाई फुले यांचा अपमान करावा. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करावा. त्यांच्याविषयी अपमानास्पद वक्तत्व करावी. हे महाराष्ट्र सहन करणार नाही. कारण हे तिघाही महापुरुषांच महाराष्ट्राच्या मातीशी नातं आहे. त्यानंतर ते विश्वाचे महापुरुष झालेत. महाराष्ट्राचा आत्मा म्हणजे हे तीन महापुरुष आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.

चाल लाख उद्योग महाराष्ट्राबाहेर गेलेत

गेल्या दोन महिन्यांत चार लाख कोटींचे उद्योग महाराष्ट्राबाहेर गेलेत. अडीच लाख लोकांना या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार मिळाला असता. दुसऱ्या राज्यात गेला. महाराष्ट्रातील गावांवर अधिकार सांगण्याचा प्रकार कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला. या सर्वांच्या विरोधात महाराष्ट्र प्रेमी उद्या एकवटणार आहेत. त्यामुळं या मोर्च्याला अडथळे आणण्याचा प्रश्नचं येत नाही, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत म्हणाले, उद्याच्या मोर्च्याविषयी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. राज्यभरातून लोकं येतील. गावागावांतून लोकं येतील.
संयुक्त महाराष्ट्राच्या मोर्च्यात अशाप्रकारचा मोर्चा निघत होता. त्या मोर्च्याची आठवण करून देणारा उद्याचा मोर्चा असेल.

मोर्च्यात हे सहभागी होणार

उद्याच्या मोर्च्यात काँग्रेस, ठाकरे गटाची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, कम्युनिष्ट पक्ष मोर्च्यात सहभागी होतील. माझ्याविरुद्ध मोर्चा काढणं म्हणजे उद्याच्या संयुक्त महाराष्ट्रासंदर्भातल्या मोर्च्याला अपशकून करण्यासारखं आहे. भाजपला वैफल्य आलेलं आहे. त्यातून हे प्रकार सुरू असल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं.