इतर राज्याचे मुख्यमंत्री आपआपल्या राज्यांचा विचार करतात, आपले मुख्यमंत्री मात्र…, आदित्य ठाकरे यांचा टोला

| Updated on: Jan 05, 2023 | 4:10 PM

इतर राज्याचे मुख्यमंत्री पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. आपले मुख्यमंत्री मात्र, दिल्लीला जाऊन बसतात, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.

इतर राज्याचे मुख्यमंत्री आपआपल्या राज्यांचा विचार करतात, आपले मुख्यमंत्री मात्र..., आदित्य ठाकरे यांचा टोला
आदित्य ठाकरे
Follow us on

मुंबई : नव्या वर्षात गद्दारांनी महापालिका निवडणूक करण्याची हिंमत दाखवावी, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं. नवीन वर्षात चांगल्या कामाची सुरुवात करत आहोत. शैक्षणिक उपक्रम सुरू करत आहोत. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या मतदारसंघात शैक्षणिक कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, नवीन वर्षाची सुरवात चांगल्या कामाने झालीय. सिनेट ठिक आहे. पण, आम्ही म्हणतो विधानसभेच्या निवडणुका घ्या. महापालिकेच्याही निवडणुका घ्या. त्यांची निवडणुका घेण्याची हिंमत नाही म्हणून हे सर्व सुरू असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले. 40 गद्दार आमदार, 13 खासदार आणि महापालिका निवडणुका घेऊन दाखवा, असं आव्हानंच आदित्य ठाकरे यांनी दिलं.

गेल्या वर्षी 1700 कोटींची काम होती. जीबीने पास केली होती. स्टँडिंग कमिटीनं पास केलेली काम आयुक्त बदलू शकतात का. आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे, यावर अभ्यास सुरू असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.

खरोखर 7 हजार कोटींची काम होऊ शकतात. जर होत असतील तर मग कल्याण नागपूरला रस्ते का नाही झाले, यावर आमचा अभ्यास सुरु आहे. मुंबईकरांचा पैसा लुटायचा हा जो प्रयत्न सुरू आहे. तो कायदेशीर रोखण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्याच्या विकासासाठी बाहेर जात नाहीत. इतर राज्याचे मुख्यमंत्री पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. आपले मुख्यमंत्री मात्र, दिल्लीला जाऊन बसतात, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.

इतर राज्याचे मुख्यमंत्री आपआपल्या राज्यांचा विचार करतात. पण, आपले मुख्यमंत्री फक्त स्वतःचा विचार करतात, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केलाय.