मनिषा म्हैसकरांसह राज्यात अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदली, कल्याण डोंबिवलीला नवे आयुक्त

| Updated on: Feb 13, 2020 | 8:45 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेतला आहे.

मनिषा म्हैसकरांसह राज्यात अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदली, कल्याण डोंबिवलीला नवे आयुक्त
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेतला आहे (Thackeray Government transfer of IAS officers). यात नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. म्हैसकर यांची राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कल्याण डोंबिवलीला देखील नवे आयुक्त मिळाले आहेत. ठाकरे सरकारच्या या निर्णयावरुन प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल होत असल्याचं दिसत आहे.

बदली झालेले सनदी अधिकारी

1. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर यांची नियुक्ती प्रधान सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

2. महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांची नियुक्ती बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तपदी करण्यात आली आहे.

3. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव एम. डी. पाठक यांची नियुक्ती नगर विकास-2 विभागाच्या प्रधान सचिव पदावर केली आहे.

4. साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. मुगळीकर यांची परभणीच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली.

5. सनदी अधिकारी डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांची नियुक्ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापालिका आयुक्तपदी करण्यात आली.

6. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे (पुणे) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांची नियुक्ती पशुसंवर्धन विभाग पुणे येथे आयुक्त म्हणून करण्यात आली.

7. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सी. के. डांगे यांची नियुक्ती मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापालिका आयुक्तपदी करण्यात आली.

संबंधित बातम्या 

फडणवीसांना धक्का, हायपरलूप प्रकल्प ठाकरे सरकारने गुंडाळला

‘ठाकरे’ सरकारचा फडणवीसांना आणखी एक दणका, पालिका क्षेत्रातील कामांना स्थगिती

ठाकरे सरकारचा फडणवीस समर्थक भाजप आमदाराला दणका   

ठाकरे सरकारचा आणखी एक दणका, अ‍ॅक्सिस बँकेतील ‘ती’ खाती वळवणार? 

संबंधित व्हिडीओ :


Thackeray Government transfer of IAS officers