VIDEO | राजा, आमचं खूप नुकसान झालंय, सुमनताईंचा फोन, राज ठाकरे म्हणाले काळजीच करु नका

| Updated on: May 27, 2021 | 3:10 PM

वृद्धाश्रमाचं मोठं नुकसान झाल्यानंतर रणदिवेंनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील यांच्याकडे मदतीची याचना केली होती. 'टीव्ही9 मराठी'च्या वेबसाईटवर याबाबतचं वृत्त प्रकाशित झालं होतं (Raj Thackeray called Suman Randive)

VIDEO | राजा, आमचं खूप नुकसान झालंय, सुमनताईंचा फोन, राज ठाकरे म्हणाले काळजीच करु नका
Follow us on

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झाल्यामुळे मदतीची याचना करणाऱ्या 90 वर्षीय शिक्षिका सुमन रणदिवे यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तातडीने संपर्क साधला. ‘टीव्ही9 मराठी’च्या वेबसाईटवर याबाबतचं वृत्त प्रकाशित झाल्यानंतर रणदिवे ताईंशी (Suman Randive) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोनवरुन संपर्क साधला. शिक्षिकेची विचारपूस करत राज ठाकरेंनी भेटायला येण्याचं आश्वासनही दिलं. (TV9 Impact MNS chief Raj Thackeray called up and spoke to ex teacher Suman Randive gave assurance to provide help)

वृद्धाश्रमाला तौक्ते चक्रीवादळाचा फटका

सुमन रणदिवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील यांच्यासह मुंबई आणि आसपासच्या परिसरातील अनेक बड्या राजकीय नेत्यांना शिक्षणाचे धडे दिले आहेत. आधी पतीचं छत्र हरवलं, नंतर मुलालाही काळाने हिरावलं. सध्या त्या वसईतील सत्पाळा गावातील “न्यू लाईफ फाऊंडेशन” या वृद्धाश्रमात वास्तव्य करत आहेत. या वृद्धाश्रमाला तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला.

राज ठाकरेंचा फोन

वृद्धाश्रमाचं मोठं नुकसान झाल्यानंतर रणदिवेंनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील यांच्याकडे मदतीची याचना केली होती. ‘टीव्ही9 मराठी’च्या वेबसाईटवर याबाबतचं वृत्त प्रकाशित झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालय तसेच राज ठाकरे यांनी तातडीने दखल घेतली. राज ठाकरे यांनी फोनवरुन रणदिवेंशी संवादही साधला.

काय झाला संवाद?

सुमन रणदिवे : राजा
राज ठाकरे : हा नमस्कार कशा आहात?
सुमन रणदिवे : मी सुमनताई रणदिवे, वसईहून बोलतेय, तुमच्या घरी यायचे माहितेय ना ट्यूशनला वगैरे…
राज ठाकरे : हो हो, काय त्रास झाला, काय प्रॉब्लेम आहे?
सुमन रणदिवे : मध्यंतरी तू क्रिकेट मैदानाला आला होतास, पण त्या लोकांनी मला तुझी भेट दिली नाही. आमचं खूप नुकसान झालंय, जरा जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढं बघ ना
राज ठाकरे : मी आमच्या अविनाश जाधव यांना सांगितलं आहे, ते सर्व प्रकारची मदत करतील. त्यामुळे काही काळजी करु नका, तब्येत वगैरे सगळं ठीक आहे ना?
सुमन रणदिवे : हो ठीक आहे, कुंदाताई काय म्हणत आहेत?
राज ठाकरे : आई बरी आहे (Raj Thackeray called Suman Randive)
सुमन रणदिवे : ए तू ये ना एकदा मला भेटायला
राज ठाकरे : येतो, मी येतो, लॉकडाऊन वगैरे संपलं की भेटू
सुमन रणदिवे : नक्की, प्रॉमिस?
राज ठाकरे : हो नक्की

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या 

उद्धव, मी तुझी शिक्षिका, आमच्या वृद्धाश्रमाचं नुकसान झालंय, बाळा भेट मला, 90 वर्षीय शिक्षिकेची आर्त हाक

TV9 Impact : 90 वर्षीय शिक्षिकेची मदतीसाठी हाक, विद्यार्थी राज-उद्धव यांचे तातडीने रणदिवे बाईंना फोन

(TV9 Impact MNS chief Raj Thackeray called up and spoke to ex teacher Suman Randive gave assurance to provide help)