ऑपरेशन मुद्रा: सरकारचा केवळ जुमलाच, सुप्रियांचं टीकास्त्र

| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

मुंबई: टीव्ही 9 मराठीने ऑपरेशन मुद्रा अंतर्गत बँकांनी मुद्रा योजनेच्या अंमलबजावणीचा कसा बट्ट्याबोळ केला आहे, याचं स्टिंग समोर आणलं. टीव्ही 9 मराठीने बँकांचा खोटारडेपणा उघडा पाडल्यानंतर आता सरकारी पातळीवर कारवाईच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र विरोधकांनीही सरकारच्या ढिसाळ कारभारावर टीकास्त्र सोडलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी “मोठ्या गाजावाजात मुद्रा योजना आणलीत खरं पण त्याची […]

ऑपरेशन मुद्रा: सरकारचा केवळ जुमलाच, सुप्रियांचं टीकास्त्र
Follow us on

मुंबई: टीव्ही 9 मराठीने ऑपरेशन मुद्रा अंतर्गत बँकांनी मुद्रा योजनेच्या अंमलबजावणीचा कसा बट्ट्याबोळ केला आहे, याचं स्टिंग समोर आणलं. टीव्ही 9 मराठीने बँकांचा खोटारडेपणा उघडा पाडल्यानंतर आता सरकारी पातळीवर कारवाईच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र विरोधकांनीही सरकारच्या ढिसाळ कारभारावर टीकास्त्र सोडलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी “मोठ्या गाजावाजात मुद्रा योजना आणलीत खरं पण त्याची अंमलबजावणी होतेय का? उद्योगधंदा करु पाहणाऱ्या तरुणांना बँका दारातही उभा करत नाहीत. हा सुद्धा तुमच्या सरकारचा केवळ एक जुमलाच ठरलाय” असा घणाघात सरकारवर केला.

 

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही मुद्रा योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींवर सरकारला धारेवर धरलं. “मुद्रा लोनचे नाव काढले की, तरुणांना बँका दारात ही उभा करत नाहीत याचे महाराष्ट्र भरातील बँकामधील विदारक सत्य TV9 मराठी या वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन मुद्राद्वारे समोर आणले आहे, या धाडसाबद्दल टीव्ही 9 मराठीचे आणि रिपोर्टर ब्रह्मा चट्टे यांचं कौतुक केलं.

सोमावारी रात्री ठीक 9 वाजता tv9 नं मोदींच्या मुद्रा योजनेचा बँका आणि त्यांचे अधिकारी कसे बँड वाजवतात, हे महाराष्ट्राला दाखवलं. एखादा तरुण जर मुद्रा लोनसाठी बँकेत गेलाच, तर बँक व्यवस्थापक कसे हाकलून लावतात हेही वास्तवही आम्ही मांडलं. त्यानंतर आता विरोधकांसह सरकारनंही दखल घेत कारवाईचं आश्वासन दिलंय.

ऑपरेशन मुद्रा

टीव्ही 9 मराठीने मुद्रा लोनच्या अंमलबजावणीबाबत 12 जिल्ह्यातील 30 सरकारी आणि खासगी बँकांमध्ये जाऊन स्टिंग केलं. मुद्रा लोन मिळतं की नाही याबाबतची चाचपणी केली. पण एकाही बँकांनी या योजनेबाबत सकारात्मकता दाखवली नाही. एकाही बँकांने मुद्रा लोन देऊ असं म्हटलं नाही. अनेक बँक मॅनेजर्सनी या योजनेची खिल्ली उडवली, पंतप्रधान नरेंद्र मोदी बँका बुडवायला निघालेत असं म्हटलं. तर काही बँक मॅनेजर्सनी अशी कोणती योजनाच नसल्याचं म्हटलं.

काय आहे मुद्रा योजना?

कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामीनदाराशिवाय होतकरुंना अर्थसहाय्य देण्यासाठी मुद्रा लोन ही योजना सुरू करण्यात आली. या मोहिमेमुळे व्यवसाय, उत्पादन किंवा सेवा देणाऱ्यांना 50 हजारांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

मुद्रा योजनेत तीन श्रेणी आहेत. त्यांचं शिशू, किशोर आणि तरुण या गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आलं आहे. शिशू श्रेणीअंतर्गत 50,000 रुपयांचं कर्ज मिळू शकतं, तर किशोर श्रेणीत 50,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाईल. तसंच तरुण श्रेणीअंतर्गंत 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. मुद्रा बँकेद्वारे छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज मिळेल. त्याचबरोबर भाजीवाले, सलून यांनाही लोन दिलं जाईन, असं सांगण्यात येत आहे.

मुद्रा बँकेद्वारे छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज मिळेल. ज्यांना नवा उद्योग, काम सुरु करायचे असेल, त्यांनाही कर्ज मिळेल. त्याच बरोबर भाजीवाले, सलून, फेरीवाले, चहाचे दुकानदार यांनाही लोन दिले जाईल. मुद्रा बँक ही रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली काम करते. मुद्रा ही संस्था मुख्यत: लघू उद्योगांनाच अर्थ पुरवठा करते. व्याजाचा दर कमी आहे.. कर्ज मंजूर झालं की त्यानंतर कर्जदाराला ‘मुद्रा कार्ड’ दिले जाते, जे की क्रेडीट कार्डसारखे असेल आणि जेवढे कर्ज मंजूर झाले आहे तसे वापरता येईल.

द्रा योजनेची वैशिष्ट्ये

देशातील 5.77 कोटी उद्योजकांना वित्तसहाय्य

वार्षिक 7 टक्के दराने 10 लाख रुपयांपर्यंत अर्थपुरवठा

20 हजार कोटींचे भक्कम सरकारचे भांडवली पाठबळ

सीडबीची ही उपकंपनी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारित येणार

सुक्ष्म वित्त संस्थेव्यतिरिक्त बँकेकरिता स्वतंत्र विधेयक

मुद्रा लोनसाठी आवश्यक बाबी

जामीनदार आणि मोर्गेजची गरज नाही

स्वतःचे 10 टक्के भाग भांडवलची गरज नाही

ही योजना फक्त सरकारी बँकेतच होणार

वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे

अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा

टीव्ही 9 मराठीचं सविस्तर स्टिंग –   EXCLUSIVE: ऑपरेशन मुद्रा – मुद्रा लोन योजनेचा बट्ट्याबोळ