Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्याती साद, पाहा Video

| Updated on: Jun 22, 2024 | 11:58 PM

आगामी विधानसभेत अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल, असं विधान अमोल मिटकरींनी केलंय. त्यांच्या या विधानाचा रोख अप्रत्यक्षपणे शिंदेंची शिवसेना आणि भाजपसाठी होता. महत्वाचं म्हणजे अजित पवारांनी भाजपची साथ सोडल्यास पुढची चर्चा शक्य असल्याची प्रतिक्रिया वंचितनं दिलीय.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्याती साद, पाहा Video
Follow us on

अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यास राज्यात वेगळं चित्र दिसेल. असं मोठं विधान अजितदादा गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी केलंय. शिंदे आणि भाजपलाच अजितदादा नकोसे झालेत का? या चर्चा सुरु असताना अजित पवार आणि आंबेडकरांनी एकत्र यावं., अशी भावना मिटकरींनी व्यक्त केलीय. विशेष म्हणजे यावर अजितदादांनी आधी भाजपला सोडून सत्तेबाहेर पडावं., त्यानंतर चर्चा शक्य असल्याची प्रतिक्रिया वंचितनं दिलीय.

2024 च्या लोकसभेत शिंदे आणि भाजपची साथ असूनही अजितदादांची राष्ट्रवादी अपेक्षित कमाल करु शकली नाही. दुसरीकडे वंचित आघाडीच्याही मतांची टक्का 2019 च्या तुलनेत यंदा घटला. 2019 ला वंचितच्या मतविभाजनामुळे लोकसभेत भाजपच्या 9 जागा जिंकल्याचा दावा विरोधकांकडून केला जातो. पण यंदा मतविभाजनाचा फटका मविआला बसला नाही. त्यामुळे आगामी विधानसभेत जर एका बाजूला अजितदादांशिवाय महायुती, दुसर्‍या बाजूला महाविकास आघाडी आणि तिसऱ्या बाजूला अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत वंचित आघाडी असा तिसरा मोर्चा महाराष्ट्रात उभा राहिल्यास कुणाचा फायदा आणि कुणाचा तोटा होईल., याची चर्चा होऊ लागलीय.

पाहा व्हिडीओ:-

पारंपरिक मतं का दुरावली यावर अजित पवार गटात मंथन झालं होतं. त्यामुळे दुरावलेल्या मतांची मोट बांधण्यासाठी अजित पवारांचा गट खरोखर दुसर्‍या पर्यायाची चाचपणी करतोय, की मग हे फक्त महायुतीतल्या जागावाटपासाठी दबावतंत्र आहे? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कारण नेत्यांनी मौन राहून प्रवक्त्यांच्या विधानांनी याआधी अनेकदा विविध चर्चा घडवल्या गेल्या आहेत.

उदाहरणार्थ भाजपविरोधात राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी आक्रमक भूमिका घेतायत. दुसरीकडे त्यांचेच नेते अमोल मिटकरींना ताकीद देवू म्हणून सारवासारव करतायत. एकीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते जागांची मागणी जाहीरपणे करणं अयोग्य असल्याचं म्हणतायत. दुसरीकडे त्यांचेच नेते रामदास कदम जाहीर मंचावरुन 100 जागांची मागणी करतायत. वंचित आणि अजितदादांनी एकत्र यावं, ही पक्षाची नसून आपलं वैयक्तिक मत असल्याचं मिटकरींनी म्हटलंय. मात्र इतकी महत्वाची मतं पक्षश्रेष्ठींना न विचारता व्यक्त केली जातात का…हा सुद्दा प्रश्न आहे… कारण निकालानंतर मिटकरींना ३ वेळा त्यांच्याच नेत्यांनी समज दिली. मात्र वरिष्ठ नेते मला वारंवार ताकीद देत असतात. मी ते ऐकतो सुद्धा पण कुणीही येवून जर अजित पवारांविरोधात बोलत असेल, तर ते खपवून घेतलं जाणार नाही, असं अमोल मिटकरींनी नाव न घेता शिंदे गट आणि भाजपला उद्देशून म्हटलंय

2019 च्या विधानसभेत 32 जागा अशा होत्या., जिथं तिसऱ्या क्रमाकांचा उमेदवार फॅक्टर ठरला. खासकरुन राष्ट्रवादीचा कोणकोणत्या जागांवर निसटता पराभव झाला होता. दौंड विधानसभा भाजपचे राहुल कुल 746 मतांनी जिंकले…राष्ट्रवादीचा पराभव झाला., वंचितला इथं 2 हजार 633 मतं पडली. खडकवासला विधानसभा… भाजपच्या भीमराव तापकीरांनी राष्ट्रवादीविरोधात 2595 मतांनी विजय मिळवला…वंचितला 5931 मतं होती.

उल्हासनगर विधानसभा भाजप राष्ट्रवादीविरोधात अवघ्या 1946 मतांनी जिंकली. वंचितला इथं 5 हजार 677 मतं पडली. चाळीसगाव विधानसभा. भाजपनं राष्ट्रवादीचा 3 हजार 998 मतांनी पराभव केला. वंचितला इथं 38 हजार 361 मतं होती. अकोला पश्चिम विधानसभा. भाजप उमेदवारानं राष्ट्रवादीविरोधात 2838 मतांनी विजय मिळवला. वंचितला २० हजारांहून जास्तीची मतं होती.

जिंतूर विधानसभा भाजपनं राष्ट्रवादीला 3549 मतांनी पराभूत केलं. वंचितला 13 हजार 107 मतं पडली. पैठण विधानसभा शिवसेनेनं राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा 14 हजार मतांनी हारवलं…वंचितला इथं 20 हजार 564 मतं पडली. तूर्तास मिटकरींच्या एका विधानानं चर्चेचं पेव फुटल्यानंतर आपल्या विधानाचा विपर्यास झाल्याचा दावा मिटकरींनी केलाय.