NDAला बहुमत मिळाल्यानंतर आणि इंडिया आघाडीजवळही जर तरचे पर्याय सुरु झाल्यानंतर. दिल्लीत 2 बैठका झाल्या. मोदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत 18 मित्रपक्षांनी हजेरी लावली. मोदींच्या नेतृत्वावरच विश्वास ठेवला, तसा प्रस्ताव पास करण्यात आला. विशेष म्हणजे, इंडिया आघाडीच्या नजरा असलेल्या नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी NDAच्या बैठकीलाच हजेरी लावली. NDAचा नेता म्हणून मोदींचीच निवड झाली तर इकडे मलिल्कार्जुन खर्गेंच्या घरी इंडिया आघाडीची बैठक झाली. सोनिया गांधी, राहुल गांधी, अखिलेश यादव, शरद पवार, संजय राऊतांसह सर्वच इंडिया आघाडीचे नेते हजर होते. ज्यात पर्यायावर तसंच पुढची रणनीती काय यावर चर्चा झाली.
बहुमताच्याआधारावर आणि चंद्राबाबू नायडू तसंच नितीश कुमारांनी NDA सोबतच राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे स्पष्ट झालं. राष्ट्रपतींनी एनडीए नेत्यांना 7 जूनची वेळ दिलीय. संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान एनडीएचे नेते सत्तास्थापनेचा प्रस्ताव देणार, त्यानंतर पंतप्रधानपदाची मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील. NDAच्या बैठकीत मोदींना समर्थन देण्याच्या पत्रावर 20 नेत्यांच्या सह्या आहेत.
ज्यावर यांनी सह्या केल्यात, जेपी नड्डा. राजनाथ सिंह, अमित शाह, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, एकनाथ शिंदे, कुमारस्वामी, चिराग पासवान, जीतनराम मांझी, पवन कल्य़ाण, सुनिल तटकरे, अनुप्रिया पटेल,. जयंत चौधरी, प्रफुल्ल पटेल,. प्रमोद बोरो. अतुस बोरा. इंद्रा सुब्बा, सुदेश महतो, राजीव रंजन सिंह, संजय झा. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला मित्रपक्षांचीच गरज आहे. NDAच्या घटकपक्षांशी भाजपचे 4 नेते समन्वयाचं काम करणार आहेत. अमित शाह, राजनाथ सिंह, नड्डा, पीयूष गोयल समन्वयाचं काम करतील. पण इंडिया आघाडीही 234 पर्यंत पोहोचल्यानं इंडिया आघाडीच्य़ा बैठकीतही रणनीतीवर मंथन झालं. पण तूर्तास नीतीश कुमार आणि चंद्राबाबूंनी NDAची साथ न सोडण्य़ाचा निर्णय़ घेतल्यानं इंडिया आघाडीची सत्ता येण्याची शक्यता नाही.
राजकारण आकड्यांना महत्व आहे. पण एकट्या पक्षाचे असो की मित्रपक्षांचे. सध्या 272चं बहुमत एनडीए कडे असल्यानं मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान होतील. त्याआधी त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून नवं सरकार स्थापन होईपर्यंत कार्यकारी पंतप्रधानपदाची जबाबदारी मोदींकडेच असेल.