उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत उद्धव ठाकरेंबाबत पाठीमागे काय बोलतात ते कोणी तरी रेकॉर्ड करावं म्हणजे खरा नमक हराम 2 कोण हे समजेल, काँग्रेस कशी लबाड आहे, हे काल उद्धव ठाकरेंनीच सांगितलं.वीजबील माफीवरून काँग्रेसच्या चलाखीवर स्वत: उद्धव ठाकरेच बोलले. ही योजना काँग्रेसची लबाडाची योजना नाहीये.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापायला लागलंय. ठाण्यातून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केलाय. शिंदे, फडणवीस हे मोदींसमोर वळवळणारे मांडूळ असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र डागलं. दरम्यान यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या भाषणाची नक्कल उतरवत त्यांना टोला लगावला.. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. बाळासाहेब असते तर त्यांना जंगलात पाठवलं असतं असा टोला शिंदेंनी लगावला. एवढंच नव्हे तर लाडकी बहीणवरुन देखील उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला. 15 लाखांचे 1500 कसे झाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान त्यांच्या या टीकेला फडणवीसांनी देखील सडेतोड प्रत्युत्तर दिलंय.
पाहा व्हिडीओ:-
उद्धव ठाकरेंच नव्हे तर संजय राऊतांनी देखील एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. चित्रपटाच्या मुद्द्यावरुन त्यांनी शिंदेंना धारेवर धरलं. तसंच मलाही चित्रपट काढायचा आहे असं म्हणत शिंदेंवर जोरदार निशाणाही साधला. मागील काही दिवसांपासून राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. उद्धव ठाकरेंनी मोदी, शाहांसह राज्यातील महायुतीच्या नेत्यांवरही टीकास्त्र डागलंय. दरम्यान ठाकरेंनी केलेल्या टीकेला शिंदें, फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.