Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : अजित पवारांची जनसन्मान यात्रा, गुलाबी रंगाची चर्चा

| Updated on: Aug 08, 2024 | 11:17 PM

राष्ट्रवादीचा ताबा घेतल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदा विधानसभेची तयारीची सुरुवात केलीय. प्रचाराचा सर्वाधिक जोर लाडकी बहीण योजनेवर आहे. बसपासून बॅनरपर्यंत स्टेजपासून मंडपाच्या रंगापर्यंत डायसपासून अजितदादांचं जॅकेट, खांद्यावरचं उपरणं सगळीकडे गुलाबी थीम वापरत राष्ट्रवादीनं विधानसभेचा प्रचार सुरु केलाय. पाहा टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट वाचा.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : अजित पवारांची जनसन्मान यात्रा, गुलाबी रंगाची चर्चा
Follow us on

लोकसभेला ज्या भागात सर्वाधिक फटका बसला. त्याच ठिकाणापासून अजित पवारांनी जनसन्मान यात्रा सुरु केलीय. लोकसभेला दिंडोरी लोकसभेत भाजप उमेदवाराला अजितदादांचे कळवणचे आमदार नितीन पवार, येवल्यातून छगन भुजबळ, निफाडमधून दिलीप बनकर, तर दिंडोरीतून नरहरी झिरवाळ हे चारही लीड देवू शकले नाहीत. मात्र अप्रत्यक्षपणे हा फटका आमदारांमुळे नसून कांद्यामुळे बसल्याचं सांगत अजित पवारांनी समर्थकांना विधानसभेसाठी सज्जतेचे आदेश दिलेत.

पुण्यानंतर नाशिक जिल्ह्यात अजितदादा गटाचे सर्वाधिक आमदार आहेत. अजितदादांकडच्या 41 पैकी पुणे जिल्ह्यातून 10 तर नाशिक जिल्ह्यातून 7 असे 17 आमदार फक्त दोनच जिल्ह्यातले आहेत. त्यामुळेच जनसन्मान यात्रेत पुण्याबरोबरच नाशिकवर भर दिसतोय. लोकसभेला अजित पवारांकडच्या 41 आमदारांपैकी 25 आमदारा्ंच्या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्क्य होतं.. त्यामुळे विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडण्याचं आवाहन करत अजित पवारांच्या भाषणांचा मुख्य भर आता योजनांवर आहे.

पाहा व्हिडीओ:-

अजितदादांच्या जनसन्मान यात्रेचा 12 जिल्ह्यातील 39 विधानसभांमधून पहिला टप्पा पार पडेल.दिंडोरीनंतर उर्वरित नाशिक, नगर, धुळे जळगाव 16 ऑगस्टनंतर पुणे-मुंबई आणि उर्वरित भागात आणि 31 ऑगस्टला गडचिरोलीत यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होणाराय. लोकसभेला सत्ता सोबत असूनही 53 पैकी 41 आमदार सोबत नेवूनही अजित पवारांना जेमतेम एकच जागा जिंकता आली. त्यामुळे आत्ताची विधानसभा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या भविष्याची कसोटी असणाराय.