Video | Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : ‘अशोक चव्हाण डीलर ते लीडर’, भाजपने केलेल्या टीका, पाहा व्हिडीओ

| Updated on: Feb 16, 2024 | 6:43 PM

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर सोशल मीडियात जोरात चर्चा सुरु आहेत. आपला विश्वासू पासून डीलर ते लीडरपर्यंत झालेली टीकाही व्हाय़रल होतेय. काय-काय चर्चा झडल्या आणि भाजप नेत्यांनी त्यांनीच केलेल्या आरोपांवर काय उत्तरं दिलीत. पाहूयात हा रिपोर्ट.

Video | Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : अशोक चव्हाण डीलर ते लीडर, भाजपने केलेल्या टीका, पाहा व्हिडीओ
Follow us on

मुंबई : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या अशोक चव्हाणांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. फडणवीसांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपात दाखल झालेत. तर विकासाची विचारधारा मान्य असलेले अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाणांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. मुंबईतल्या भाजपच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपात आले. पंतप्रधान मोदींच्या प्रेरणेनं विकासासाठी भाजपमध्ये आल्याचं अशोकरावांचं म्हणणंय.

पाहा व्हिडीओ:-

अशोक चव्हाणांनी भाजप प्रवेशाचं उपरणं गळ्यात टाकताच सोशल मीडियात जुन्या आठवणींचा पूर आला. सर्वाधिक व्हायरल झाली ती म्हणजे अशोक चव्हाणांबाबत फडणवीसांची याआधीची आणि भाजप प्रवेशानंतरची भूमिका. विशेष म्हणजे काँग्रेसनं चव्हाणांनी इतकी पदं देऊनही ते काही करु शकले नाहीत, अशी टीका फडणवीस करत होते. मात्र चव्हाण जेव्हा भाजपात आले., तेव्हा फडणवीसांनीच काँग्रेसला नेते सांभाळता येत नाहीत म्हणून चव्हाणांच्या प्रवेशाचं कारण पुढे केलंय. मात्र जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप आणि इतर भूमिकांबाबत भाजप नेत्यांना प्रश्न विचारले गेले., तेव्हा मात्र त्यांनी उत्तरं देणं टाळलं.

दुसरा योगायोग म्हणजे नांदेड लोकसभेत गेल्यावेळी राज ठाकरेंनी भाजपविरोधात सभा घेतली होती. त्यावेळी अशोक चव्हाणांसह राज ठाकरेंवर फडणवीसांनी घणाघाती टिका केली. त्यापैकी अशोक चव्हाणच आता भाजपात आले आहेत आणि मनसेसोबत भाजपच्या युतीच्या चर्चा समोर येतायत. फडणवीसांनी ज्या अशोक चव्हाणांना डीलर म्हणून ज्या प्रतापराव चिखलीकरांना लीडर म्हटलं होतं. त्यांना मात्र भाजप प्रवेशानं आनंद झालाय की दुःख हे समजण्यापलीकडे आहे., कारण जेव्हा चव्हाणांच्या प्रवेशाच्या चर्चा होत्या. तेव्हा चिखलीकरांचं विधान चर्चेत होतं.

काँग्रेसच्या नाना पटोलेंनी भाजपनंच आपल्या ट्विटर हँडलवरुन केलेल्या आरोपांची पोस्ट दाखवली., ज्यात भाजपनं चव्हाणांना उद्देशून ”विसरला नाही महाराष्ट्र” जे म्हटलं होतं., त्यावरुनच त्यांनी भाजपला घेरलंय. भाजपमध्ये आल्यानंतर चौकश्या लागत नाहीत, निवांत झोप लागते., हे हर्षवर्धन पाटलांचं विधानही व्हायरल झालं. विरोधाभास हा आहे की., आता भाजपसोबत सत्तेत असलेले शिंदे गटाचे गुलाबराव पाटील विरोधात असताना हाच आरोप करत होते. आता भाजपसोबत सरकारमध्ये मंत्री असलेले अजित पवार सुद्धा गेली अनेक वर्ष भाजपवर अशाच प्रकारचे आरोप करत होते.

चव्हाणांनी काँग्रेसच्या राजीनाम्याच्या पत्रात शेवटी ”आपला विश्वासू” असा उल्लेख केलाय. तो देखील सोशल मीडियात सर्वाधिक व्हायरल झाला. आता पत्रात आपला विश्वासू लिहिण्याचा पायंडा बंद करायला हवा, असंही अनेक नेटकऱ्यांनी लिहिलं. काहींनी म्हटलं की राजीनाम्यावेळी आपला विश्वासू लिहिण्याचं जे धाडस आहे, ते जबरदस्तच म्हणावं लागेल,काही म्हणतायत की भाजपचा पुढचा अध्यक्ष देखील मूळ काँग्रेसी असू शकतो. काहींनी लिहिलंय की नार्वेकरांचा काही भरवसा नाही., ते अशोक चव्हाणांना सुद्धा काँग्रेस पक्ष देऊ शकतात तर काहींनी लिहिंलय की अशोकाचं झाड ना सावली देत ना फळ….नुसतीच पानगळती.

कुणी म्हणतंय की महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाला किमान कुलूप लावायला तरी कुणी थांबलं पाहिजे.दुसरीकडे भाजप कार्यालयात सर्व काँग्रेसी आणि राष्ट्रवादीवाले बसले असून मूळ भाजपचे बाहेर तिष्टत उभे असल्याचं व्यंगचित्रही चर्चेत आहे. प्रवेशावेळी चव्हाणांनी पक्षनिधी म्हणून एक नोट दिली. त्यानंतर बावनकुळेंनी भाजपप्रवेशाचा अर्ज दिला., तो प्रसंग देखील व्हायरल झालाय. शिवाय इतकी वर्ष काँग्रेसमध्ये काढल्यामुळे भाजपप्रवेशानंतरही चव्हाणांच्या तोंडी काँग्रेस आल्यानं एकच हशा पिकला. अजित पवारांनंतर अशोक चव्हाणांनी कसे भाजपसोबत वा भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले होते, त्याचेही व्हिडीओ व्हायरल झाले. सत्तेत जाण्याच्या ४ महिन्यांपूर्वी अजित पवारांनी मारलेला डोळा., आणि मविआच्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाणांनी मारलेली कलटी. हे दोन्ही व्हिडीओ चर्चेत आहेत.

महिन्याभरापूर्वी गाडीत दाटीवाटीनं बसण्याचा जो व्हिडीओ व्हायरल झाला होता., तो देखील अशोक चव्हाणांच्या प्रवेशानं पुन्हा व्हायरल होतोय. त्या व्हिडीओसोबत सोबत बावनकुळेंनी त्या व्हिडीओवर दिलेलं उत्तर सुद्धा.सोशल मीडियात काही जण म्हणतायत की भाजपात अब पुराने तीन यार मिलेंगे. यात नारायण राणे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे महसूल मंत्री राहिले. नंतर भाजपात मंत्री झाले. विखे पाटील सुद्धा काँग्रेसमध्ये महसूल मंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होते., नंतर ते देखील भाजपमध्ये जावून मंत्री झाले. अशोक चव्हाण देखील काँग्रेसचे मुख्यमंत्री., आणि महसूल मंत्री राहिले., त्यांनी सुद्दा भाजपची वाट धरलीय. तूर्तास शिंदे गटाच्या संजय शिरसाटांनी अचूक वर्तवलेली भविष्यवाणी चव्हाणांनीच अखेर खरी करुन दाखवली.

भाजपचे किरिट सोमय्यांची अशा पक्षप्रवेशानंतर नेहमीप्रमाणे गोची झालीय. कारण, सोमय्यांनी ज्यांना-ज्यांना अटकेचा किंवा तुरुंगात जाण्याचा इशारा दिला होता., ते नेते योगायोगानं भाजपमध्ये किंवा भाजपसोबत सत्तेत गेले. जर समजा भविष्यात काँग्रेसचे काही आमदार अशोक चव्हाणांसोबत सत्तेत गेले., तर महाराष्ट्रात ऐतिहासिक राजकीय समीकरणं जुळून येतील म्हणजे 105 आमदारांसह भाजप पूर्णपणे सत्तेत आहे. राष्ट्रवादीचा एक गट विरोधात, दुसरा गट सत्तेत. शिवसेनेचा एक गट विरोधात, दुसरा गट सत्तेत. आणि त्यापाठोपाठ चव्हाणांसोबत काही आमदार गेल्यास काँग्रेसचेही काही आमदार विरोधात आणि काही चव्हाणांसोबत भाजपमध्ये अर्थता सत्तेत दिसू शकतात.

आता विधानसभेतलं सध्याचं आणि जर-तरचं चित्र समजून घ्या. जेव्हा शिंदे-फडणवीसांनी मविआविरोधात बहुमत जिंकलं तेव्हा शिंदे-फडणवीसांच्या बाजूनं 164 आमदार होते आणि मविआच्या म्हणजे विरोधी बाकांवर 99 आमदार होते. वर्षभरानं अजित पवारांचा गट सत्तेत गेला…त्यांच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे 43 आमदार आहे. म्हणजे आत्ताचं संख्याबळ शिंदे-फडणवीस आणि अजित पवार मिळून 164+43 म्हणजे 207 इतकं आहे आणि विरोधी बाकांवर 73 आमदार उरले आहेत. समजा उद्या काँग्रेसचे अशोक चव्हाणही २ तृतीयांश आमदार घेऊन गेले तर शिंदे-फडणवीसांचे 164+ दाव्यानुसार अजित पवारांकडे 43+ अशोक चव्हाणांसोबतचे 30 असं मिळून सत्ताधाऱ्यांचा एकूण आकडा होईल 237 इतका होईल., आणि विरोधक म्हणून विरोधी बाकांवर फक्त 43 आमदार उरतील.