टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : अमृत फडणवीस यांना लाच देवून अडकवण्याचा प्रयत्न?, मिसेस उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात कट

| Updated on: Mar 16, 2023 | 11:44 PM

या प्रकरणात आपल्यालाच अडकवण्याचा कसा डाव होता?, हे उपमुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलंय. थेट उपमुख्यमंत्र्यांची पत्नी, अमृता फडणवीसांनीच लाच देण्याचा आणि ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न झालाय.

टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : अमृत फडणवीस यांना लाच देवून अडकवण्याचा प्रयत्न?, मिसेस उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात कट
Follow us on

मुंबई : अमृता फडणवीसांना लाच देण्याचा आणि ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न झालाय. त्यासंदर्भात अमृता फडणवीसांनी पोलिसांत तक्रार दिलीय. मात्र या प्रकरणात आपल्यालाच अडकवण्याचा कसा डाव होता?, हे उपमुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलंय. पाहुयात.

थेट उपमुख्यमंत्र्यांची पत्नी, अमृता फडणवीसांनीच लाच देण्याचा आणि ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न झालाय. पोलिसांनी ताब्यात घेतलेली हीच ती तरुणी आहे. अनिक्षा याच अनिक्षानं मिसेस उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधातच कट रचला. अनिल जयसिंघानी नावाचा व्यक्ती 7 ते 8 वर्षांपासून फरार आहे, त्याच्यावर 14 ते 15 गुन्हे दाखल आहेत.

जयसिंघानीची मुलगी आहे, अनिक्षा. ती पेशानं ड्रेस डिझायनर आहे. अनिक्षानं आधी अमृता फडणवीसांना वारंवार भेटून विश्वास संपादन केला त्यानंतर वडिलांना चुकीच्या पद्धतीनं अडकवल्याचं सांगून वाचवण्यासाठी सांगितलं. काही काळानंतर वडिलांचे बुकींशी संबंध असल्याचंही अमृता फडणवीसांना सांगितलं. त्याचवेळी अनिक्षानं 1 कोटींची ऑफरही देण्यात आल्याचं अमृता फडणवीसांनी तक्रारीत सांगितंय. मात्र अमृता फडणवीसांनी नकार देताच काही मेसेज आणि व्हिडीओ मोबाईलवर पाठवून ब्लॅकमेलिंग केलं.

विधानसभेत ब्लॅकमेलिंग संदर्भात माहिती देताना, देवेंद्र फडणवीसांनी धक्कादायक माहितीही दिलीय. ज्या अनिल जयसिंघानीच्या विरोधातल्या केसेस मागे घेण्याचा तिच्या मुलीचा खटाटोप होता. त्या केसेस महाविकास आघाडीच्या काळात मागे घेण्यास सुरुवात झाली होती, असंही फडणवीसांनी सांगितलंय.

याआधी मला अडकवण्याचा प्रयत्न झाला..पण कुटुंबीयांनाही अडकवण्यासाठी ट्रॅप रचण्यात आला. मात्र यामागे कोण मास्टरमाईंड आहे, हे समोर येईल, असा सूचक इशाराही फडणवीसांनी दिलाय. अनिल जयसिंघानी अजून फरारच आहे. पण मुलगी अनिक्षाला पोलिसांनी ताब्यात घेतलं..त्यामुळं चौकशीत ट्रॅपच्या मागे फक्त जयसिंघानीच्या केसेस मागे घेण्याचा उद्देश होता की अमृतांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांनाच अडकवण्याचा डाव होता, हे स्पष्ट होईल.