Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : बारामती लोकसभा मविआने जिंकली, विधानसभेला सहा विधानसभांचं गणित जाणून घ्या

| Updated on: Jun 22, 2024 | 11:47 PM

बारामती लोकसभा निकालानंतर विधानसभेचं चित्र काय आहे. कुठून कोण इच्छूक आहेत., विधानसभेच्या हिशेबानं या घडीला कुणाचं पारडं जड आहे., पाहूयात बारामती लोकसभेतल्या ६ विधानसभांचा हा रिपोर्ट.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : बारामती लोकसभा मविआने जिंकली, विधानसभेला सहा विधानसभांचं गणित जाणून घ्या
Follow us on

बारामती लोकसभेत दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. दौंडमधून राहुल कूल भाजपचे आमदार आहेत., इंदापुरातून अजितदादा गटाचे दत्तात्रय भरणे, बारामतीतून अजित पवार, पुरंदरमधून काँग्रेसचे संजय जगताप, भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि खडकवासल्यात भाजपचे भीमराव तापकीर आमदार आहेत.

विधानसभा मतदारसंघानुसार लोकसभेत महायुतीचं पारडं जड होतं. सुनेत्रा पवारांच्या बाजूनं दौंड, इंदापूर, बारामती, खडकवासला या ४ मतदारसंघांचे आमदार होते. तर सुप्रिया सुळेंच्या बाजूनं पुरंदर आणि भोरच्या आमदार होते. मात्र तरी देखील सुप्रिया सुळेंना 7 लाख 32 हजार 312 तर सुनेत्रा पवारांना 5 लाख 73 हजार 979 मतं पडली. सुळेंचा 1 लाख 58 हजार 333 मतांनी विजय झाला.

2019 च्या निवडणुकीत बारामती लोकसभेत 12 लाख 99 हजार 242 मतदान झालं होतं., टक्केवारी 61.44% होती. यंदा 14 लाख 12 हजार 349 मतदान झालं, मात्र वाढलेल्या मतदारसंख्येच्या तुलनेत मतदान कमी झाल्यानं टक्केवारी 59.50 इतकीच राहिली. 2019 ला सुळेंनी 6 लाख 83 हजार 705 मतं मिळवून 52.94% टक्के मतदान घेतलं होतं. विरोधातल्या भाजप उमेदवार कांचन कूल यांना 5 लाख 28 हजार 711 मतं, तर 40.94% टक्के मतं होती.

पाहा व्हिडीओ:-

यंदा सुळेंना 7 लाख 32 हजार 312 मतं, तर 51.85% टक्के मतं मिळाली. आणि सुनेत्रा पवारांनी 5 लाख 73 हजार 979 मतं मिळवून 40.64% मतं घेतली. 2019 च्या तुलनेत सुळेंना 48 हजार 607 मतदान यंदा जास्त झालं., तर टक्केवारीत 1.1 टक्के मतं घटली. सुनेत्रा पवारांना गेल्यावेळच्या उमेदवाराच्या तुलनेत 45 हजार 268 मतं जास्त पडली., पण टक्केवारीत 0. 30 टक्क्यांची घट झाली.

2019 ला भोरमध्ये सुळेंना 19 हजार, पुरंदरात 9 हजार 600, इंदापुरात 70 हजार, बारामतीत 1 लाख 27 हजारांचं लीड होतं. तर भाजपच्या कांचन कूल यांना दौंडमध्ये 7 हजार 53 आणि खडकवासल्यात 65 हजारांची आघाडी होती. 2024 ला भोरमध्ये सुळेंना 43 हजार 805, पुरंदरात 35 हजार 281, इंदापुरात 25 हजार 951, बारामतीत 47 हजार 381, दौंडमध्ये 26 हजार 337 या 5 ठिकाणी सुळेंनी मताधिक्क्य मिळवलं. तर एकमेव खडकवासल्यात सुनेत्रा पवारांना 20 हजार 746 मतांची आघाडी मिळाली

बारामतीतल्या 6 विधानसभेत 2019 ला महायुतीतून भाजपनं 4 तर शिवसेनेनं २ जागा लढवल्या होत्या. आघाडीत राष्ट्रवादी ४ आणि काँग्रेस २ जागी लढली. निकालानंतर भाजपला 2 जागा मिळाल्या., शिवसेनेला शून्य आघाडीत राष्ट्रवादीनं २ आणि काँग्रेसनं दोन जागा जिंकल्या होत्या. 2019 च्या विधानसभेत 3 जागा चुरशीच्या ठरल्या होत्या. दौंडमधून भाजपचे राहुल कुल फक्त 746 मतांनी जिंकले. इथं वंचितला 2 हजार 633 मतं पडली. इंदापुरात राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे भाजपच्या हर्षवर्धन पाटलांविरोधात 3 हजार 110 मतांनी विजयी ठरले. खडकवासल्यात भाजपचे भीमराव तापकीर अवघ्या 2595 मतांनी विजयी झाले. इथं वंचितला 5931 मतं होती.

यंदा बारामती लोकसभेतल्या 6 विधानसभांमध्ये संभाव्य लढती आणि इच्छूकांची नावं बघितल्यास. बारामतीत महायुतीतून अजित पवार मविआतून युगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा आहे. भोरमध्ये महायुतीत भाजपकडून किरण दगडे, जीवन कोंडे, शिंदे गटाकडून कुलदिप कोंडे इच्छूक आहेत. तर मविआत काँग्रेसचे संग्राम थोपटे उमेदवार असणार.. दौंडमध्ये महायुतीकडून भाजपचे राहुल कुल, भाजपचेच वासुदेव काळे, अजितदादा गटाकडून रमेश थोरात इच्छूक आहेत. मविआत शरद पवार गटाकडून आप्पासाहेब पवार आणि नामदेव ताकवणेंचं नाव चर्चेत आहे.

पुरंदरात महायुतीकडून शिंदे गटाचे विजय शिवतारे, भाजपचे अशोक टेकवडे, बाबा जाधवराव इच्छूक आहेत. तर मविआकडून संजय जगतापांची उमेदवारी प्रबळ आहे. इंदापुरात महायुतीत अजितदादा गटाचे दत्ता भरणे, तर भाजपकडून हर्षवर्धन पाटलांचं नाव चर्चेत राहू शकतं. शरद पवार गटाकडून आप्पासाहेब जगदाळेंचं नाव पुढे येतंय. खडकवासल्यात भाजपचे भीमराव तापकीर, अजितदादा गटाचे सचिन दोडके, रुपाली चाकणकरांचं नाव घेतलं जातंय., तर मविआतून अद्याप कुणाचीही चर्चा नाहीय.