Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : गणेशोत्सवानंतर खडसे भाजपात? फडणवीस तयार, पाहा Video

| Updated on: Sep 14, 2024 | 11:05 PM

सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत असलेल्या खडसेंचे भाजपात घरवापसीचे मार्ग खुले होताना दिसत आहेत...केंद्रीय नेतृत्वानं निर्णय घेतलाय, गणेशोत्सवानंतर ठरवू असं फडणवीस म्हणालेत. पाहा त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : गणेशोत्सवानंतर खडसे भाजपात? फडणवीस तयार, पाहा Video
Follow us on

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं, एकनाथ खडसेंबद्दलचं हे वक्तव्य फार मोठं आहे. खडसेंबद्दल केंद्रीय नेतृत्वानं निर्णय घेतलेला आहे. गणेशोत्सवानंतर केंद्रीय नेतृत्वाशी बोलून ठरवू असं फडणवीस म्हणालेत. म्हणजेच गणेश विसर्जनानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये अधिकृतपणे येवू शकतात, असेच संकेत फडणवीसांच्या बोलण्यातून दिसतेय. 2 दिवसांआधी TV9शी बोलताना, खडसेंनी भाजप हायकमांडच्याच विनंतीवरुन भाजपमध्ये ऑलरेडीच प्रवेश झाल्याचा दावा केला होता.

इकडे, मंत्री गिरीश महाजनांनी खडसेंना टोला लगावलाय…गेल्या दिवाळीचे उरलेले फटाके फोडून स्वागत करु असं महाजन म्हणालेत. आता खडसे पुन्हा भाजपमध्ये आल्यास नेमका काय फायदा होईल तेही पाहुयात. एकनाथ खडसेंचा ओबीसी चेहरा अशी ओळख आहे. मुक्ताईनगर, जळगाव शहर आणि भुसावळ विधानसभा मतदारसंघावर खडसेंचा प्रभाव आहे. मुक्ताईनगरमध्ये खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंचा अपक्ष चंद्रकांत पाटील अवघ्या 1957 मतांनी विजयी झाले. आणि आता ते शिंदेंसोबत आहेत.

पाहा व्हिडीओ:-

जळगाव शहरमध्ये सुरेश भोळे भाजपचे आमदार आहेत, ते खडसेंच्या जवळचे मानले जातात. भुसावळमध्येही भाजपचेचे संजय सावकारे आमदार असून तेही खडसेंच्या खास आहेत. जळगाव जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा मतदारसंघ आहे आणि खडसेंना मानणारा एक वर्ग आहे. त्यामुळं खडसे भाजपात आल्यास त्याचा फायदा भाजपला होईल खडसे स्वत: लेवा पाटील आहेत,आणि जळगाव जिल्ह्यातील 11 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात लेवा पाटलांची मतं निर्णायक आहेत.

फडणवीसांआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनीही खडसे भाजपसोबतच राहतील त्यांचा निर्णय लवकरच होईल असं म्हटलंय. जवळपास 40 वर्षे भाजपात राहून, खडसेंनी ऑक्टोबर 2020मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर आमदारही केलं. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते शरद पवारांच्याच सोबत आहेत. तर त्यांचीच सून रक्षा खडसे भाजपातच असून, लोकसभेत त्यांना पुन्हा तिकीटही दिलं आणि निवडून आल्यावर केंद्रात मंत्रीही केलं. लोकसभेआधीच भाजपची नाजूक स्थिती पाहून भाजपच्या नेतृत्वानंच आपल्याला मदत करण्याची विनंती केली होती, असा गौप्यस्फोटही खडसेंनी TV9शी बोलताना केला. फडणवीस आणि गिरीश महाजन हे दोघेच नेते खडसेंच्या टार्गेटवर राहिलेत. मात्र फडणवीसांनीच आता, गणेशोत्सवानंतर निर्णय होणार असल्याचं सांगून स्वत:कडून ग्रीन सिग्नल असल्याचं दाखवलंय.