Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : देशात ‘इंडिया’ला बहुमत, निकालाआधीच आकड्यांचा दावा, पाहा व्हिडीओ

| Updated on: May 15, 2024 | 3:51 PM

लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जूनला येणार आहे.ममात्र, आतापर्यंत 3 नेत्यांनी जागांचा अंदाज वर्तवलाय. ताजा अंदाज आहे, काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाणांचा. महाविकास आघाडीला 35 पर्यंत जागा मिळू शकतात तसंच इंडिया आघाडीला बहुमत मिळेल, असा दावा पृथ्वीराज चव्हाणांचा आहे.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : देशात इंडियाला बहुमत, निकालाआधीच आकड्यांचा दावा, पाहा व्हिडीओ
Follow us on

महाराष्ट्रासह देशात मतदानाचे टप्पे अजून बाकी आहेत.  4 जूनच्या निकालाआधीच भाकितं सुरु झालीत. नवा दावा, काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. विशेष म्हणजे याआधी शरद पवारांनीही आकडा घोषित केलाय आणि रोहित पवारांनीही दावा केलाय. पृथ्वीराज चव्हाणांचा दावा आहे, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 32-35 जागा मिळेल. म्हणजेच महायुतीला 13-16 जागा. देशात इंडिया आघाडीला 240-260 जागा मिळू शकतात.

शरद पवारांनी सांगितलंय की, महाविकास आघाडीला 30-35 जागा मिळतील. याचाच अर्थ महायुतीला 13-18 जागा मिळू शकतातआणि रोहित पवारांचा दावा आहे, की महायुतीचे 16-18 खासदार जिंकू शकतात. म्हणजेच रोहित पवारांनी महाविकास आघाडीला, 30-35 जागा दिल्यात. महाराष्ट्रात आणखी एका टप्प्याचं मतदान बाकी आहे.

त्याआधीच महाविकास आघाडीचे नेत्यांचा कॉन्फिडन्स वाढलाय. पृथ्वीराज चव्हाणांचं म्हणणंय आहे की, भाजपला पुन्हा सत्ता मिळणं कठीण आहे. देशात भाजपच्या विरोधात वातावरण आहे. इंडिया आघाडीला देशभरात 240-260 जागा मिळतील. महाराष्ट्रातलंही चित्र वेगळं नाही. महाराष्ट्रात 32-35 जागा महाविकास आघाडीच्या येतील. काँग्रेसच्या 12जागा निवडून येवू शकतात. आणि अजित पवार गटाची एकही जागा निवडून येणार नाही. यानंतर भाजपच्या नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाणांचा समाचार घेतला. रोहित पवारांनी तर महायुतीला 16-18 जागा देतानाच, अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, अशी बोचरी टीका केली.

महाराष्ट्रात भाजपचं मिशन 45 आहे. 2019 मध्ये युतीत लढताना, भाजपचे 23 खासदार जिंकले होते. युतीत शिवसेनेचे 18 जागा आल्या होत्या. आघाडीत काँग्रेसला 1 जागा आणि राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या होत्या. पण आता युती आणि आघाडीच समीकरणच बदललंय शिवसेना आणि राष्ट्रवादी हे 2 पक्ष फुटलेत. महायुतीत शिंदेची शिवसेना आणि महाविकास आघाडीत ठाकरेंची शिवसेना आहे. महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. तर महाविकास आघाडीत शरद पवारांची राष्ट्रवादी आहे. त्यामुळं गेल्या दोन अडीच वर्षातल्या राजकीय घडामोडीनंतर, महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल तसंच देशाचाही मूड पुढच्या 20 दिवसांत अर्थात 4 जूनला स्पष्ट होईल