वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरांवर अखेर यूपीएससीनं कारवाईचा बडगा उचललाय. यूपीएससीनं नोटीस बजावत थेट तुमची निवड रद्द का करु नये., यासाठी खेडकरांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय. त्यामुळे पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या पूजा खेडकरांनी खुर्ची धोक्यात आलीय.
यूपीएससीनं म्हटलंय की., पूजा खेडकरांनी अनेकदा नाव बदलून परीक्षा दिल्या. स्वत: बरोबरच आई-वडिलांचं नाव बदललं फोटो, स्वाक्षरी, पत्ता, मोबाईल नंबर बदलला. यामुळे नियमाबाह्यरित्या अनेकदा यूपीएससी परीक्षा दिली. पूजा खेडकरांनी याआधीची यूपीएससी परीक्षा पूजा दिलीप खेडकर नावानं दिली. नंतर त्यांनी पूजा मनोरमा दिलीप खेडकर नाव लावून त्यात आईचं नाव जोडलं. त्यानंतर पूजा मनोरमा दिलीपराव खेडकर असंही नाव एका परीक्षेत लावल्याचा आरोप आहे. मात्र गोंधळ फक्त नावापुरताच नाहीय. तर 2022 ला दिव्यांग सर्टिफिकेट देवून ज्या आरक्षण कोट्यातून खेडकर नियुक्त झाल्या. जे ओबीसी नॉनक्रिमिलेयर सर्टिफिकेट देण्यात आलं. त्यातही फसवणुकीचा आरोप असून त्याचीही चौकशी सुरुय.
कदाचित इतका मोठ्या सावळा गोंधळ कधीच समोरही आला नसता. याला कारणीभूत ठरला पूजा खेडकरांचा शाही थाट. काही दिवसांपूर्वी पूजा खेडकर पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाल्या. प्रशिक्षणार्थी असूनही त्यांनी स्वतःसाठी स्वतंत्र गाडी, कॅबिन, स्वतंत्र शिपाई आणि खासगी गाडीवर सरकारी दिवा लावल्यानं वादाची सुरुवात झाली. त्यानंतर फक्त खेडकरांची नियुक्तीच नव्हे तर त्यांच्या अख्खं कुटुंबच चौकशीच्या घेऱ्यात आलं.
खेडकरांच्या आई मनोरमा खेडकरांना शेतकऱ्याला पिस्तुल दाखवल्याच्या आरोपात अटक झाली. वडिल दिलीप खेडकरांमागे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात चौकशी लागली. ज्या कंपनीशी खेडकरांचं संबंधाचा आरोप झाला., ती कंपनी कर थकवल्याप्रकरणी सील झाली. ज्या डॉक्टर-अधिकाऱ्यांनी खेडकरांना ओबीसी आणि दिव्यांग सर्टिफिकेट दिलं., ते रडारवर आले आता स्वतः खेडकरांनी नियुक्ती रद्द होण्याच्या मार्गावर आहे., खेडकरांविरोधात यूपीएससीनंच गुन्हा दाखल केलाय.
इतक्या कारवायानंतर जो मुख्य प्रश्न उरतो. तो म्हणजे यूपीएससी सारख्या परीक्षेत इतका गोंधळ सुरु असेल तर यंत्रणेला इतक्या उशिरानं जाग कशी येते? आणि दुसरं म्हणजे ही प्रकरणं एकट्या पूजा खेडकरांपर्यंत मर्यादीत आहेत की मग अजूनही अनेक प्रकरणं समोर येण्याच्या प्रतीक्षेत आहेत.