Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : बहीण अन् बारामती, युतीत वादाची ठिणगी? पाहा Video

| Updated on: Sep 09, 2024 | 11:31 PM

बारामतीतून अजित पवार लढणार की नाही. यावरुन वाद रंगलेला असताना लाडक्या बहिणीवरुन महायुतीत पडलेली वादाची ठिणगी वाढत चालल्याचा दावा केला जातोय. फडणवीसांच्या देवाभाऊ नावाच्या पोस्टरवर शिंदेंचा फोटो असला तरी अजित पवारांचा फोटो गायब झालाय. वाच हा एक रिपोर्ट.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : बहीण अन् बारामती, युतीत वादाची ठिणगी? पाहा Video
Follow us on

बारामतीत स्वतःच्या उमेदवारीबद्दल सस्पेन्स तयार करणारे अजित पवार यंदा पराभूत होणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. बारामतीला एकदा दुसरा आमदार मिळू द्या. त्यानंतर आपली किंमत लक्षात येईल, अशा आशयाचं विधान अजित पवारांनी काल केलं होतं. त्यावरुन अजित पवार यंदा लढणार की नाही., याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर अजित पवार आमचे कॅप्टन असल्यामुळे ते शस्र टाकणार नाही, असं म्हणत भुजबळांनी अजित पवार बारामतीतूनच लढतील, असे संकेत दिलेत.

राजकीय जाणकारांच्या मते अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा दीड लाखांहून जास्तीच्या पराभवाच्या धक्क्यातून अजित पवार गट
अजूनही सावरलेला नाही. कारण अजित पवार सोबत असताना सुप्रिया सुळे 2019 ला 1 लाख 55 हजार 774 मतांनी जिंकल्या
आणि अजित पवारांसह भाजप-शिंदे विरोधात असतानाही 2024 ला सुळे 1 लाख 58 हजार 333 मतांनी म्हणजे गेल्यावेळपेक्षा ३ हजार मतं जास्त घेवून विजयी झाल्या.

दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर इथं महायुतीचे आमदार असूनही सुळेंना मोठं मताधिक्क्य मिळालं. खुद्द अजित पवार आमदार असलेल्या बारामतीत सुळे 47 हजारांनी पुढे राहिल्या. आणि सुनेत्रा पवारांना फक्त भाजप आमदार असलेल्या खडकवासल्यात लीड घेता आलं. त्यामुळेच अजित पवार बारामतीकरांपुढे खंतवजा दबावतंत्र वापरत असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. माहितीनुसार जोपर्यंत बारातमीत अजित पवारांविरोधात शरद पवार कुणाला उमेदवारी देणार, हे स्पष्ट करत नाहीत, तोवर अजित पवार गटाकडून बारामतीबद्दल सस्पेन्स कायम ठेवला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार बारामती विधानसभेत स्वाभिमान यात्रा काढून उमेदवारीच संकेत देतायत.

पाहा व्हिडीओ:-

अमित शाहांनी महायुतीत वाद चव्हाट्यावर न आणण्याची सूचना केल्या असल्या तरी तिकडे विदर्भात अजित पवार गटाचे १० जिल्हाध्यक्ष महायुतीवर नाराज असल्याचं समोर आलंय. भाजपनं लोकसभेला विदर्भात अजित पवार गटाला एकही जागा दिली नाही., जिल्हाध्यक्षांची कामं होत नसल्याची तक्रार केलीय. जागावाटप, निधीच्या नाराजीबरोबरच लाडकी बहीण योजनेचं श्रेय महायुतीतल्या तणातणीसाठी मुख्य कारणीभूत ठरत असल्याची चर्चा आहे.

योजनेचं मूळ नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, ज्याचा उल्लेख शिंदे समर्थक पोस्टरद्वारे करतात अजित पवारांच्या पोस्टरवर मुख्यमंत्री शब्द गायब असून फक्त लाडकी बहिण लिहिलं जातंय, पुढे दादांचा वादा म्हणूनही शब्द आहेत तर फडणवीसांच्या पोस्टरवर देवाभाऊ…लाडक्या बहिणीला महिन्याला 1500 देणार म्हणून उल्लेख केला जातोय. या पोस्टरवर फडणवीसांसह मोदी आणि-शिंदेंचा फोटो असून अजित पवार मात्र गायब आहेत.

लाडकी बहीण योजना महायुती सरकारची असूनही अजित पवार गटाच्या जाहिरातीत फक्त अजितदादांचाच प्रचार होत असल्यावरुन कॅबिनेट बैठकीत वाद झाला होता. त्यानंतर आता पुन्हा अजित पवार गटानं दादांचा वादा म्हणून एक नवं गाणं आगामी निवडणुकांसाठी प्रदर्शित केलंय त्यावर जितेंद्र आव्हाडांनी निशाणा साधलाय.