छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरुन राज्यात चांगलाच वाद निर्माण झालाय. शिवरायांनी सुरतेची लूट केली नसून त्यांनी सुरतेवर आक्रमण केल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. दरम्यान त्यांच्या या विधानानंतर राज्यात जोरदार राजकारण तापलंय. देवेंद्र फडणवीसांनी इतिहास नीट वाचावा असं म्हणत संजय राऊतांनी त्यांच्यावर शरसंधान साधलंय.
काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केलाय. तसंच काँग्रेसनं शिवरायांचा चुकीचा इतिहास शिकवल्याचा दावा देखील त्यांच्याकडून करण्यात आला. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. फडणवीसांनी शिवरायांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय. तर आव्हाडांच्या टीकेनंतर भाजप नेते प्रवीण दरेकरांनी देखील जोरदार पलटवार केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूरत लुटेविषयी इतिहासकारांनी देखील आपली मतं व्यक्त केलीत. फडणवीसांनी सन्मानित केलेल्या पुरंदरेंच्या पुस्तकात देखील सुरत लुटेचा उल्लेख असल्याच इतिहासकार इंद्रजित सावंतांनी म्हटलंय.
पाहा व्हिडीओ:-
मालवणच्या राजकोटमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं मागील अनेक दिवसांपासून राज्यात राजकारण रंगलंय. दरम्यान आता देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानानंतर देखील राज्याचं राजकारण चांगलंच तापताना दिसतंय.