Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : मतदानाच्या वाढत्या टक्केवारीवरुन आरोप-प्रत्यारोप, पाहा व्हिडीओ

| Updated on: May 23, 2024 | 10:10 PM

मतदानाचा पाचवा टप्पा संपला असला तरी मतदानाच्या वाढत्या टक्केवारीवरुन वाद कायम आहे. यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होतायत. निवडणूक आयोगानं त्यावर काय स्पष्टीकरण दिलंय. अंतिम आकड्यांमध्ये १ कोटी ७ लाखं मतं वाढल्याचा आरोप काँग्रेसनं का केलाय.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : मतदानाच्या वाढत्या टक्केवारीवरुन आरोप-प्रत्यारोप, पाहा व्हिडीओ
Follow us on

मतदानाच्या वाढत्या टक्केवारीवरुन आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरुच आहे. पाचव्या टप्प्यात म्हणजे 20 तारखेला महाराष्ट्रात किती टक्के मतदान झालं, याची अंतिम आकडेवारी आज म्हणजे ३ दिवसांनी निवडणूक आयोगानं जारी केली. 20 तारखेला रात्री पावणे आठ वाजता निवडणूक आयोगानं अंदाजीत आकडेवारी दिली की महाराष्ट्रातलं मतदान हे 48.88 टक्के इतकं झालंय. यानंतर २० तारखेलाच रात्री साडे ११ वाजता निवडणूक आयोगानं नवा सुधारित अंदाज सांगितला की महाराष्ट्रातलं मतदान 54.29 टक्के झालंय.

पाहा व्हिडीओ:-

आज म्हणजे २३ तारखेला निवडणूक आयोगानं अंतिम आकडेवारी जाहीर करत महाराष्ट्रात 56.89 टक्के मतदान झाल्याचं सांगितलंय. आता मतदारसंघ निहाय मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत किती आकडेवारी होती आणि अंतिम आकडेवारी किती होती पाहा.

भिवंडीत 20 तारखेला 5 वाजेपर्यंत निवडणूक आयोगानं 48.89 टक्के मतदानाचा अंदाजित आकडेवारी दिली होती. निवडणूक आयोगानं आज अंतिम आकडा जाहीर केलाय, 59.89 टक्के. धुळ्याचा अंदाजित आकडा होता 48.81टक्के. अंतिम आकडा आहे 60.21 टक्के. दिंडोरीत 57.06 टक्के, अंतिम आकडा आहे 66.75 टक्के, कल्याण 41.70 टक्के., अंतिम आकडा 50.12 टक्के, नाशिकमध्ये 51.16 टक्के, अंतिम आकडा आहे 60.75 टक्के, मुंबई उत्तर लोकसभेत 46.91 टक्के, अंतिम आकडा 57.02 टक्के मुंबई उत्तर मध्य मध्ये 47.32 टक्के, अंतिम आकडा आहे 51.98 टक्के, मुंबई उत्तर पूर्व मध्ये 48.67 टक्के, अंतिम आकडा आहे 56.37 टक्के , मुंबई उत्तर पश्चिममध्ये 49.79 टक्के, अंतिम आकडा 54.84 टक्के, मुंबई दक्षिणमध्ये 44.22 टक्के, अंतिम आकडा 50.06 टक्के, मुंबई दक्षिण मध्य मध्ये 48.26 टक्के, आणि अंतिम आकडा आहे 53.60 टक्के यावर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आहे.

अनेक मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत झालेलं मतदान संध्याकाळी ६ पर्यंत रांगेत उभ्या असलेल्या लोकांचं मतदान आणि दुर्गम भागातली आकडेवारी अपडेट होण्यास येणाऱ्या तांत्रिक अडचणी. यामुळे अंदाजित आणि अंतिम आकड्यात फरक आहे. दरम्यान पहिल्या चार टप्प्यात अंदाजित आणि अंतिम आकडेवारीत तब्बल १ कोटी ७ लाख मतदान कसं काय वाढलं. यावर काँग्रेसनं निवडणूक आयोगाला प्रश्न केले आहेत.