विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटल्यानं मविआला मोठा धक्का बसला. दरम्यान फुटलेल्या या आमदारांना काँग्रेस 6 वर्षांसाठी निलंबित करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. तर दुसरीकडे याच काँग्रेस आमदारांसंदर्भात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी एक मोठं विधान केलंय..
ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलीय. त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलंय. दरम्यान या फुटलेल्या आमदारांचा शोध कसा घेण्यात येणारय. काँग्रेसचे फुटलेले आमदार कसे समजणार?
पाहा व्हिडीओ:-
क्रॉस व्होटिंगवरुन संजय राऊतांनी पुन्हा एकदा महायुतीवर गंभीर आरोप केलेयत. 10 कोटी ते 25 कोटी आमदारांना रोख दिल्याचा आरोप संजय राऊतांकडून देण्यात आलाय. तर राऊतांनी केलेल्या आरोपांना प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिलंय. आमदारांना 10 ते 25 कोटी आणि जमिनी दिल्यात संजय राऊतांना समन्स पाठवून चौकशीला बोलावलं पाहिजे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केलेल्या आमदारांची ओळख पटली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलंय. मात्र, दुसरीकडे सुधीर मुनगंटीवारांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.