उत्तर प्रदेशची राजधानी लखनौतल्या एका चौकात रस्ता खचून तब्बल ७ ते ८ फूट खोल खड्डा तयार झाला. सुदैवानं त्यावेळी या रस्त्यावर कोणतीही वाहनं नव्हती. उत्तर प्रदेशातल्या राजधानीतच रस्त्याची ही अवस्था असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. चार ते पाच महिन्यांपूर्वी लखनौतच अशाच खड्डा पडला होता., एक कार या खड्ड्यात पडताना थोडक्यात वाचली होती. त्यावेळी रस्त्यावर २० फूट खोल खड्डा झाला होता. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये रस्त्यांवरुन नदी नाले वाहतायत., इथल्या एका खड्ड्यात तरुण आपल्या बाईकसह बुडाला होता. सुदैवानं जीवितहानी झाली नाही.
उत्तराखंडमध्ये पावसाच्या तडाख्यामुळे पूल काही सेकंदात जमीनदोस्त होऊन वाहून गेला. रामनगर ते राणीखेतसह अनेक भागांना जोडणारा हा पूल होता. बिहारमध्ये मागच्या १५ दिवसातच ९ पूल कोसळले आहेत., त्यामुळे कामाच्या दर्जावरुन सरकारवर टीकेची झोड उठलीय. बिहारमध्ये 18 जूनला अरारियाचा पूल कोसळला. 12 कोटींचा खर्च करुन बांधलेला हा पूल उद्घाटनाआधीच कोसळला.
पाहा व्हिडीओ:-
22 जूनला बिहारमध्ये सिवानचा पूल कोसळला. सिवान भागातच मागच्या काही दिवसात एकूण ३ पूल कोसळल्याची घटना घडलीय. 23 जूनला मोतिहारी भागात पूल कोसळला. या पुलाचंही उद्घाटन बाकी होतं. मात्र बांधकाम सुरु असतानाच दीड कोटीच्या खर्चानं बांधलेला पूल पाण्यात गेला. 28 जूनला मधुबनीमधला पूल कोसळला. या पुलाचंही उद्घाटन राहिलं होतं. बांधकाम सुरु असतानाच पूल कोसळला. साडे ३ कोटी रुपये या पुलाच्या बांधकामावर खर्च झाले होते. बिहारमधल्या पूल दुर्घटनांवरुन सोशल मीडियात अनेक व्हिडीओ व्हायरल होतायत. ज्यात बांधकामांच्या दर्जावरुन टीका केली जातेय.