Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : राष्ट्रवादीत मिटकरी एकटे पडले? पाहा Video

| Updated on: Aug 01, 2024 | 10:45 PM

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एकाकी पडले आहेत का, असा प्रश्न आहे. कारण मनसेच्या हल्ल्यानंतर आपल्याच पक्षातले नेते गप्प का, असा प्रश्न खुद्द मिटकरींनी केलाय.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : राष्ट्रवादीत मिटकरी एकटे पडले? पाहा  Video
Follow us on

हल्लेखोरांवर कारवाई करा म्हणून अमोल मिटकरी आपल्या लेकीसह अकोला पोलीस अक्षीक्षकाच्या कार्यालयाबाहेर बसले आहेत. पोलीस खात्यावरही मिटकरींनी सवाल केलेत. मनसेवाले खुलेआम धमकी देत असताना पोलीस काय करतायत., असा प्रश्न मिटकरींनी केलाय. विशेष म्हणजे राज ठाकरेंवर मी बोललो तर त्यांचे समर्थक अंगावर आले. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून कुणीच का बोलत नाही, असाही प्रश्न मिटकरींनी विचारलाय.

अजित पवार नसतानाही धरणातून पाणी सोडलं गेलं., असं विधान राज ठाकरेंनी पुण्यात केलं. त्यावर राज ठाकरे हे सुपारीबहाद्दर आहेत म्हणून मिटकरींनी उत्तर दिलं. मात्र मिटकरी आता आपल्याच विधानापासून बदलल्याचंही चित्र आहे. मनसेचे जे कर्णबाळ नावाचे पदाधिकारी हे मूळ मुंबईतल्या चेंबूरमधले आहेत. मात्र फक्त मिटकरींना धमकावण्यासाठी ते अकोल्यात गेले. तिथं मिटकरींची गाडी फोडली गेली.

पाहा व्हिडीओ:-

हल्ल्यानंतर एक 26 वर्षीय मनसे समर्थकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. मृत तरुण मालोकार हा होमियोपॅथी मेडिकल कॉलेजला तिसऱ्या वर्षाला होता. मात्र आता त्याच्या मृत्यूची जबाबदारी कुणाची. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

याआधी राज ठाकरेंनी देशाच्या बड्या नेत्यांपासून ते महाराष्ट्रातल्या नेत्यांपर्यंत अनेक जिव्हारी लागणारी विधानं केलीयत. मात्र त्यावेळी नेत्यांच्या समर्थकांनी राज ठाकरे वा त्यांच्या समर्थकांच्या गाड्यांवर हल्ले केले नाहीत. पण आता राज ठाकरेंचेच सैनिक गाड्या फोडू लागले आहेत.