VIDEO : TV9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट, ‘शिवराय मुस्लिमद्वेष्टे होते अशी प्रतिमा रंगवतात’, व्याख्याते आणि अनिल बोंडे वाद

| Updated on: Feb 21, 2023 | 11:36 PM

अमरावतीत शिवजयंतीनिमित्त एका मंचावर घडलेला प्रकार व्हायरल झालाय. व्याख्याते आणि खासदार अनिल बोंडे यांच्यात वाद झाला. वादामुळे काही काळ गोंधळही उडाला.

VIDEO : TV9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट, शिवराय मुस्लिमद्वेष्टे होते अशी प्रतिमा रंगवतात, व्याख्याते आणि अनिल बोंडे वाद
Follow us on

मुंबई : अमरावतीत शिवजयंतीनिमित्त एका मंचावर घडलेला प्रकार व्हायरल झालाय. व्याख्याते आणि खासदार अनिल बोंडे यांच्यात वाद झाला. वादामुळे काही काळ गोंधळही उडाला. मात्र त्यानंतर पुढचा कार्यक्रम सुरळीत पार पडला. पण दरम्यानच्या काळात नेमका कशावरुन वाद झाला. पाहूयात हा रिपोर्ट.

एका बाजूला व्याख्याते तुषार उमाळे दुसऱ्या बाजूला बसलेले हे भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे निमित्तं होतं शिवजयंतीनिमिचं, विषय होता शिवरायांचे विचार आणि त्यांची मांडणी मात्र हे व्याख्यानं चर्चेत आलं. खासदार महोदयांच्या संतापानं, अमरावतीच्या सार्वजनिक शिवजयंती समितीनं विशेष व्याख्यानं आयोजित केलेलं होतं.

आयोजकांना व्याख्यानासाठी तुषार उमाळेंना तर पाहुणे म्हणून खासदार अनिल बोंडेसह इतरांना निमंत्रण दिलं. व्याख्यानाला सुरुवात झाली. काही लोक शिवराय हे फक्त मुस्लिमद्वेष्टे होते अशीच प्रतिमा रंगवतात, यावर व्याख्याते तुषार उमाळे बोलत होते. त्याच दरम्यान राग अनावर झालेल्या खासदार अनिल बोंडेंनी व्खाख्यात्याला ”ऐ शहाण्या मूर्ख आहेस का”, अशा शब्दात रोखलं. आणि तिथून पुढचा गोंधळ सुरु झाला.

गोंधळामुळे आयोजकांची पळापळ झाली एक जण व्याख्याते उमाळेंच्या जवळ येऊन ”जरा सौम्य बोला” म्हणून कानात पुटपुटला. मात्र व्याख्याते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपासून सुरु झालेला हा विषय पुढे शायरीवर जाऊन संपला.

शिवकाळातली सामाजिक स्थिती आणि सद्यस्थिती याच्या तुलनेवर अनेकदा आक्षेप घेतला जातो. कारण खुद्द शिवाजी महाराजांच्या सैन्यात असंख्य मुस्लिम सरदार होते. शिवरायांच्या आग्रा सुटकेत महत्वाची भूमिका निभावणारे मदारी मेहतर वकील काजी हैदर सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबानं मराठ्यांशी चर्चेसाठी एक हिंदू वकील पाठवला होता. त्याउलट शिवरायांनी त्यांच्या बाजूनं वकिल म्हणून काजी हैदर या एका मुस्लिमाला निवडलं सिद्दी हिलाल.

स्वराज्याकडून पन्हाळाचा वेढा उठवताना सिद्दी हिलाल आपल्या मुलांसहीत स्वराज्याकडून लढला. त्या लढाईत त्याचा मुलगा शत्रूच्या कैदेतही सापडला होता. अफजलखान वधाच्या वेळेस शिवरायांसोबतच्या 10 अंगरक्षकात सिद्दी इब्राहिम नावाचा एक सरदार होता. दौलतखान, सिद्धी मिस्त्री यांच्याकडे आरमाराजी जबाबादारी होती नूरखान बेग, मौलाना हैदर अशी असंख्य मुस्लिम सरदार शिवरायांसोबत स्वराज्यासाठी लढलेत.

काही वर्षांपूर्वी ज्या सांगली-मिरजमध्ये अफजलखान वधाच्या देखाव्यावरुन हिंदू-मुस्लिम दंगल झाली होती. त्याच सांगलीत काल मुस्लिमांनी शिवजयंती काढली. स्वराज्याशी इमान राखणाऱ्या मुस्लिम सरदारांच्याही प्रतिमा लावत शिवरायांना अभिवादन केलं आणि इकडे संत गाडगेबाबा-तुकडोजी महाराजांच्या अमरावतीत व्याख्यानात असा वाद झाला.