मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या जरांगे पाटलांना एका जुन्या प्रकरणात कोर्टाची पायरी चढावी लागणारय. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील उद्या पुणे न्यायालयात हजर राहणार आहेत. मनोज जरांगे पाटलांविरोधात पुणे न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं होतं.. दरम्यान यानंतर जरांगे पाटील पुणे न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहणार आहेत.
प्रत्येक प्रयोगाला 5 लाख याप्रमाणे 30 लाख रुपये देण्याचं आयोजकांनी कबूल केल्याचा घोरपडेंचा दावा .मात्र प्रयोगाचे पूर्ण पैसे दिले नसल्याची धनंजय घोरपडेंकडून तक्रार करण्यात आली होती. पैसे न मिळाल्यानं घोरपडेंनी कोर्टात धाव घेतली, मात्र तारखेवर गैरहजर राहिल्यानं जरांगे पाटलांविरोधात पुणे न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी झालं. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप जरांगे पाटलांवर करण्यात आलाय. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देत जरांगे पाटलांनी राज्य सरकारवरच पलटवार गंभीर आरोप केले आहेत.
पाहा व्हिडीओ:-
मराठा आरक्षणावरुन जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. आम्हाला सरकारनं दिलेलं 10 टक्के आरक्षण मान्य नसून आमच्या मागण्या पूर्ण करा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. तसंच जोपर्यंत मराठा समाज ओबीसीमध्ये येत नाही तोपर्यंत EWS आरक्षण सरकारनं रद्द करु नये अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगे पाटील उद्या कोर्टात हजर राहणार. त्यामुळे कोर्ट या प्रकरणावर कोणता निर्णय देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणारय.