Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : राज ठाकरे यांचा अवघ्या 3 तास आणि 20 मिनिटांमध्येयू- टर्न?, नेमकं काय प्रकरण

| Updated on: May 09, 2023 | 12:05 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकातल्या निवडणुकांवर एक ट्विट केलं. कर्नाटक निवडणुकीत मराठी उमेदवारांनाच मत द्या असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. पण महाराष्ट्र एकीकरण समितीच्या त्या पोस्टनंतर केल्यानंतर राज ठाकरेंनी आपलं ट्विट डिलीट का केलं? पाहा टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट,

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : राज ठाकरे यांचा अवघ्या 3 तास आणि 20 मिनिटांमध्येयू- टर्न?, नेमकं काय प्रकरण
Follow us on

मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकातल्या निवडणुकांवर एक ट्विट केलं. कर्नाटक निवडणुकीत मराठी उमेदवारांनाच मत द्या असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. पण महाराष्ट्र एकीकरण समितीनं टीका केल्यानंतर राज ठाकरेंनी आपलं ट्विट डिलीट केलं. नेमकं काय आहे हे प्रकरण.

सकाळी म्हणाले, कुठल्याही पक्षाला मतदान करा पण उमेदवार मराठीच हवा. दुपारी म्हणाले..महाराष्ट्र एकीकरण समितीलाच मतदान करा. अवघ्या 3 तास आणि 20 मिनिटांमध्ये राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेवरुन यू- टर्न घेतलाय. सकाळी 11 वाजून 32 मिनिटांनी राज ठाकरेंनी एक ट्विट केलं.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या 10 मेला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या का पक्षाचा असेना, तो मराठी असायला हवा. आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायला हवीच. यासाठी सीमाभागातील लोकांना 10 मे रोजी संधी आहे. मराठी आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं. हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका. आपला राज ठाकरे

काही वेळानंतर राज ठाकरेंनी हे ट्विट डिलीट आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं आवाहन करताना दुसरं ट्विट केलं. राज ठाकरेंनी दुसरं ट्विट केलं 2 वाजून 52 मिनिटांनी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या 10 मेला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा.

इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या गळचेपीविरोधात किंवा मराठी माणसांवर सीमाभागात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विधानभवनात तोंड उघडणार नाहीत. यासाठी सीमाभागातील लोकांना 10 मे रोजी संधी आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं. हे तुमच्या आणि पर्यायानं मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका. आपला- राज ठाकरे

राज ठाकरेंनी अवघ्या 3 तास आणि 20 मिनिटांमध्ये यू-टर्न का घेतला असेल? यामागचं कारणही इंटरेस्ट्रिंग आहे. राज ठाकरेंनी पहिलं ट्विट केल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव या फेसबुक पेजवरुन एक पोस्ट करण्यात आली. राज ठाकरेजी, आम्ही लढू. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार करु. आणि सीमाभागातील मराठी जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच निवडून आणू. एखादं राज्य दुसऱ्या एका भाषेची संस्कृती ऱ्हास करण्याच्या प्रयत्नांना तुम्ही खतपाणी घालताय हे बरोबर नाही. एवढी वर्षे तुम्ही राजकीय क्षेत्रात आहात. काय चूक आणि काय बरोबर हे देखील कळत नाही तर तुम्ही पुढे महाराष्ट्राचा वारसा काय सांगणार? जय महाराष्ट्र

महाराष्ट्र एकीकरण समितीनं केलेल्या या जळजळीत ट्विटनंतर राज ठाकरेंनी आपली भूमिका बदलली का? पहिल्या ट्विटमध्ये राज ठाकरे महाराष्ट्र एकीकरण समितीचं नाव घ्यायचंही कसं विसरले? महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरच्या मराठीबहुल भागात सगळ्याच पक्षांचे उमेदवार मराठी असतील हे राज ठाकरेंच्या लक्षात आलं नाही का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या उद्योगधंद्यांवरुनही राज ठाकरेंच्या 2 भूमिका पाहायला मिळतायत. जानेवारी महिन्यात उद्योग बाहेर जाण्यावरुन राज ठाकरेंनी टीका केली. मात्र एक-दोन उद्योग बाहेर गेल्यानं फरक पडत नसल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलं होतं. पण ती भूमिकाही राज ठाकरेंनी बदलली उद्योग बाहेर जाणं हे महाराष्ट्राच्या अर्थकारणाला न परवडणारं असल्याचं राज ठाकरेंचं सध्याचं मत आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंनी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती. मात्र त्यांची ती भूमिकाही कायम राहिली नाही. त्यामुळं राज ठाकरे आधी घेतलेल्या भूमिकेवर ठाम का राहत नाही? असा सवाल विरोधक उपस्थित करु लागले आहेत.