Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : ‘लाडका भाऊ’ योजनेवरून राजकारण तापलं, पाहा Video

| Updated on: Jul 19, 2024 | 12:18 AM

लोकसभेनंतर विधानसभेलाही मुंबईत ठाकरे विरुद्ध शिंदेंमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे. मुंबईतील 36 जागांपैकी 25 जागांवर ठाकरे गट निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. तर महायुतीत शिंदे गटाकडून मुंबईतील 17 जागांवर लढण्यासाठी एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पाहुयात एक रिपोर्ट

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : लाडका भाऊ योजनेवरून राजकारण तापलं, पाहा Video
Follow us on

लोकसभेनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणारय. दरम्यान विधानसभेसाठी मविआत ठाकरे गट आणि शरद पवार गटाचं जागावाटप निश्चित झाल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. मात्र, या जागावाटपात सर्व पक्षांचं लक्ष आहे त्या मुंबईतील 36 जागांवर. लाडका भाऊ’ योजनेच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात चांगलंच राजकारण तापलंय. दरम्यान या योजनेवरुन विरोधकांनी सरकावर टीका करत गंभीर आरोपही केलेयत, वाचा संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर लाडका भाऊ योजनेची घोषणा केलीय. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या घोषणेनंतर राज्यात चांगलंच वातावरण तापलंय. विरोधकांनी या योजनेवरुन सरकारला चांगलंच धारेवर धरलं असून जोरदार हल्लाबोल केलाय.

लाडका भाऊ योजनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर आरोप केलेयत. सरकारकडून तरुणांची फसवणूक सुरु असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी केलाय. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजनेची घोषणा केल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंनी देखील सरकारवर टीका केलीय.

पाहा व्हिडीओ:-

एकीकडे विरोधकांनी योजनांवरुन सरकारवर निशाणा साधलाय. मात्र, दुसरीकडे सत्तेत असणारे बच्चू कडू यांनी लाडका दिव्यांग योजना सुरु करण्याची मागणी केलीय. तर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनेप्रमाणे लाडका शेतकरी योजना सुरु करण्याची मागणी केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या योजनांच्या घोषणेनंतर राज्यात जोरदार राजकारण रंगलंय. मात्र, आगामी विधानासभेच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षीत करण्यासाठी निर्णय घेतला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय.