महाराष्ट्रात मुस्लिम मतदारांची संख्या 12 % इतकी आहे. आणि मुंबईल्या 6 मतदारसंघात ही टक्केवारी 15 ते 21 टक्क्यांपर्यंत आहे…म्हणजेच महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबईत मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे. शेवटच्या टप्प्यात मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघासह कल्याण आणि ठाण्यासाठी मतदान होणार आहे. इथं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी ताकद असून उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ आहे.आणि मराठी मतांसह मुस्लिम मतदार निर्णायक आहेत.
आता जरा मुंबईतल्या 6 मतदारसंघातील आकडेवारी समजून घेवूया. 2019 च्या आकडेवारीनुसार दक्षिण मुंबईत 15 लाख 37 हजार 955 एकूण मतदार आहेत. त्यात 21.01% म्हणजेच 3 लाख 24 हजार 508 मतदार मुस्लीम आहेत. दक्षिण मध्य मुंबईत एकूण मतदार आहेत. 13 लाख 88 हजार 390. ज्यात 19.7 टक्के म्हणजेच 2 लाख 73 हजार 512 मुस्लीम मतदार आहेत.
मुंबई उत्तर पश्चिममध्ये एकूण मतदार आहेत. 19 लाख 8 हजार 991..त्यात 18.8 टक्के मुस्लीम..म्हणजेच 3 लाख 58 हजार 890 मुस्लीम आहेत, उत्तर मुंबईत 15 लाख 63 हजार 706 एकूण मतदार आहेत…त्यात मुस्लिमांचा टक्का आहे…9.2 %… म्हणजेच 1 लाख 43 हजार 860 मुस्लिम मतदार आहेत. मुंबई उत्तर मध्य एकूण मतदार 16 लाख 10 हजार 246 इतके आहेत…त्यात मुस्लिमांची संख्या आहे, 24.06 %…म्हणजेच 3 लाख 96 हजार 120 मुस्लिम व्होटर्स आहेत. मुंबई उत्तर पूर्व एकूण मतदार आहेत, 15 लाख 27 हजार 514…त्यात मुस्लीम 16.2 टक्के…2 लाख 47 हजार 457 मुस्लिम मतदार आहेत. ही आकडेवारी 2019ची असली तरी यात एकूण 2 ते अडीच लाख मतदारांची भर पडते…त्यानुसार 20 ते 22 हजार मुस्लीम मतदारांची आणखी वाढ असेल.
तसं तर भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत हिंदुत्वावरुन आतापर्यंत लढाई होतीच. ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका भाजपकडून होतेय. तर आमचं चूल पेटवणारं हिंदुत्व असल्यानंच मुस्लीम आमच्या सोबत असल्याचा दावा उद्धव ठाकरेही उघडपणे करतात. खरं तर मुस्लिम फॅक्टरची एंट्री पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ओबीसी आरक्षणाच्या वक्तव्यावरुन सुरु झाली.
इंडिया आघाडी सरकारमध्ये आल्यास, ओबीसींचं आरक्षण मुस्लिमांना दिलं जाईल, असा आरोप मोदींनी केला. त्यानंतर राज ठाकरेंनी मशिदीतून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करण्यासाठी फतवे सुरु झाल्याचा आरोप केला. तर 2 दिवसांआधीच नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकल्याचा आरोप केला. अर्थात तो झेंडा पाकिस्तानचा नसून मुस्लिमांचा धार्मिक ध्वज आहे आणि भारतीय मुस्लिम हा झेंडा वापरतात. मुंबईत आतापर्यंत मराठी तसंच परप्रांतिय मतदार डोळ्यासमोर ठेवून समीकरणं तयार होत होती आणि बिघडत होती पण आता M अर्थात मुस्लिम फॅक्टर महत्वाचा आहे.