ओबीसी आंदोलक, लक्ष्मण हाकेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ओबीसी आरक्षणावरुन निशाणा तर साधलाच. पण दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना प्रोटेक्शन देणारे मुख्यमंत्री असून उमेदवारी देतानाही 20-20 कोटी मागत असल्याचा आरोप करुन हाकेंनी खळबळ उडवलीय. जरांगे पाटलांचं 4 दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरु आहे. तिथून काही अंतरावरच लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे ओबीसी बचाव आरक्षणासाठी उपोषण करतायत. मात्र अचानक हाकेंनी, मुख्यमंत्री शिंदेंवर जळजळीत टीका केलीय. ओबीसी शब्दही न उच्चारणाऱ्या मुख्यमंत्र्यांची लाट वाटते असं टीकास्त्र हाकेंनी सोडलंय.
पाहा व्हिडीओ:-
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे पाटलांची आहे. जरांगेंच्या याच मागणीला लक्ष्मण हाकेंचा विरोध आहे. आता तर निवडणूकच ओबीसी विरुद्ध मराठा अशीच होणार असं हाके म्हणालेत. हाकेंच्या आरोपांना आणि टीकेला शिंदेंचे मंत्री शंभूराज देसाईंनी उत्तर दिलंय..तर, सरकारला मागण्या मान्य न केल्यास इशारे जरांगेंवरही हाकेंनी टीका केली. हाके आणि वाघमारेंच्या उपोषणाला 2 दिवस झालेत. तर चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती बिघडलीय. मात्र उपोषणावर जरांगे ठाम आहेत.