Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : वाढवण बंदरावरून पंतप्रधान मोदींची निशाणा, पाहा Video

| Updated on: Aug 30, 2024 | 10:23 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते, पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमीपूजन झालं. तर मच्छिमारांनी मात्र विरोध कायम असल्याचंच आंदोलनातून दाखवून दिलं. दुसरीकडे प्रकल्पाला उशीर करण्यावरुन मोदींनी विरोधकांना घेरलं.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : वाढवण बंदरावरून पंतप्रधान मोदींची निशाणा, पाहा Video
Follow us on

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमीपूजन करण्यात आलं. तर दुसरीकडे मच्छिमार बांधवांनी आपला विरोध कायम असल्याचं दाखवलं. एकूण 76 हजार कोटींची गुंतवणूक वाढवण बंदराच्या प्रकल्पात होणार आहे. मात्र मासेमारीवर परिणाम होईल म्हणून मच्छिमार बांधवांनी बोटींवर काळे फुगे लावून आपला विरोध दाखवला. मच्छिमार बांधवाला वाऱ्यावर सोडणार नाही.तसंच अत्याधुनिक बोटी तसंच नोकऱ्याही उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन फडणवीस आणि अजित पवारांनी दिलं.

पाहा व्हिडीओ:-

पालघरमधील वाढवण बंदराचा प्रस्तावित खर्च 76 हजार कोटी इतका आहे. भारताची सागरी कनेक्टिव्ही वाढेल, निर्यातीत वाढ होणार. मोठी मालवाहू जहाज उतरलीत, अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. 12 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा दावा आहे. जगातील पहिल्या 10 बंदरात वाढवण बंदराचा समावेश होईल. तर पंतप्रधान मोदींनी वाढवण बंदराला रोखण्यावरुन आघाडी आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. वाढवण बंदराचा पहिला टप्पा 2029 मध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळं भूमिपूजनाप्रमाणंच लोकार्पणही मोदीच करतील, असं मुख्यमंत्री म्हणालेत. वाढवण बंदराचं भूमिपूजन झालं असलं तरी, मच्छिमार बांधव अजूनही आक्रमक आहेत.आणि पुन्हा सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय.