महाविकास आघाडीत वंचितवरून काय घडतंय? प्रकाश आंबेडकरांचा राऊतांवर गंभीर आरोप

| Updated on: Mar 12, 2024 | 10:50 PM

महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर आणि संजय राऊतांमधली जागा वाटपावरुन शाब्दिक चकमक एकमेकांना खोटं पाडण्यापर्यंत पोहोचलीय. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना पत्र लिहून अप्रत्यक्षपणे वेगळ्या आघाडीची ऑफर दिलीय. काँग्रेस आणि वंचितनं सोबत बसून जागा वाटप करुन दोघे पुढं जावू असं म्हटलंय.

महाविकास आघाडीत वंचितवरून काय घडतंय? प्रकाश आंबेडकरांचा राऊतांवर गंभीर आरोप
Follow us on

मुंबई :  लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा या किंवा पुढच्या आठवड्यात घोषित होऊ शकते. मात्र आळशीपणामुळं आणि कुठलीही घाई नाही या वागणुकीमुळं अद्याप महाविकास आघाडीतील जागा वाटप होऊ शकलेलं नाही. माझ्या मते, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत 10 जागांवर तर काँग्रेस-शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत 5 जागांवर वाद आहे. मी 9 मार्चला काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथलांशी फोनवरुन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी फॅक्चर झालेली ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत असताना ज्या 18 जागा जिंकल्या होत्या त्यावर ठाम आहे.

चेन्नीथलांची चिंता पाहून मी असा प्रस्ताव दिला की, काँग्रेस आणि वंचितनं एकत्रित बसावं. आणि काँग्रेसच्या मनात असलेल्या आणि मविआत मागणी केलेल्या जागांवर चर्चा करावी. मला असं सांगण्यात आलं की बाळासाहेब थोरात तुमच्याशी चर्चा करतील. अद्याप त्यांनी संपर्क साधलेला नाही पण आशा आहे की चर्चेसाठी बाळासाहेब थोरात तारीख ठरवतील जेणे करुन काँग्रेस आणि वंचित आघाडी दोघे मिळून भाजप-संघाला उद्धवस्त करण्यासाठी पुढे जातील.

प्रकाश आंबेडकर वारंवार म्हणतायत की, महाविकास आघाडीत 15 जागांवर वाद आहे…त्याच वेळी जागा वाटपावरुन संजय राऊतांना खोटं बोलत असल्याचं सांगून आंबेडकरांनी राऊतांवर निशाणा साधला. आम्ही महाविकास आघाडीकडून वंचितला आंबेडकरांना हव्या 4 जागांचा प्रस्ताव दिल्याचं राऊत म्हणतायत. तर जागा वाटपासाठी आम्ही मविआसोबत बसतो.

पाहा व्हिडीओ:-

संजय राऊतांसोबत नाही, असं म्हणून आंबेडकरांनी पुन्हा राऊतांच्या 4 जागांचा प्रस्ताव धुडकावून लावला. प्रकाश आंबेडकरांनीच, राऊतांना खोटं बोलत असल्याचं म्हटल्यानं, भाजपच्या नितेश राणे राऊतांवर बोलण्याची संधी मिळाली. महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन गँगवॉर सुरु असल्याची टीकाही नितेश राणेंनी केली. महाविकास आघाडीसोबतच्या बैठका झाल्यात. पण अंतिम तोडगा निघालेला नाही. आता आंबेडकरांनी काँग्रेसलाच प्रस्ताव देऊन वेगळा ट्विस्ट आणलाय.