महाविकास आघाडीच्या बंदविरोधात हायकोर्टात जाणारे गुणरत्न सदावर्ते हा महायुती सरकारचा लाडका याचिकाकर्ता असल्याची टीका संजय राऊतांनी केलीय. जेव्हा-जेव्हा शिंदे-फडणवीस सरकार संकटात येतं, तेव्हा तेव्हा लाडक्या याचिकाकर्त्याची मदत होते., असा आरोप राऊतांनी केलाय. एकीकडे मविआ नेत्यांनी बंदऐवजी काळ्या फिती लावून बदलापूरच्या घटनेचा निषेध नोंदवला. तर दुसरीकडे सदावर्ते दाम्पत्यानं सुद्धा आजच्याच दिवशी परिधान केलेला काळ्या रंगाचा ड्रेस, काळ्या रंगाचा चष्मा आणि अनोखा लूक चर्चेत होता. सदावर्तेंनी आतापर्यंत केलेल्या याचिका किंवा तक्रारींवर विविध आरोप होत आले आहेत.
याआधीच्या फडणवीस सरकारमध्ये मराठा आरक्षणाविरोधात सदावर्तेंनी याचिका केली. त्यानंतर आता शिंदे सरकारनं दिलेल्या १० टक्के आरक्षणाविरोधातही सदावर्ते कोर्टात गेले आहेत. गेल्यावर्षी अंगणवाडी सेविकांनी पुकारलेल्या संपात हायकोर्टात याचिका जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदविरोधात हायकोर्टात याचिका जरांगेंच्या मुंबईतल्या मोर्चाविरोधात हायकोर्टात याचिका मविआ काळात रश्मी ठाकरेंनी ध्वजास सॅल्यूट न केल्याचा आरोपात तक्रार मविआ काळातच मराठी पाट्यांसाटी देवनागरी फॉन्टच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा.
तूर्तास एसटी विलीनीकरणासाठी महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ एसटी बंद करणाऱ्या सदावर्तेंनी यावेळी मात्र कायदा कोणत्याही बंदला परवानगी देत नसल्याच्या कारणावरुन हायकोर्टात धाव घेतली होती.