शरद पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केलेत. पहिलं म्हणजे 2019 ला स्थापन झालेली महाविकासआघाडी 2014 मध्येच बनवण्याचं ध्येय होतं. त्यामुळेच शिवसेना-भाजपात वितुष्ट निर्माण व्हावं यासाठीच भाजपला न मागता आम्ही पाठिंबा दिल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. 2019 ला उद्धव ठाकरेंना नेतृत्व देण्यास आपलाच पुढाकार होता. मात्र त्याआधी शिवसेनेत शिंदेंचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे याची कोणतीही कल्पना नव्हती, असं शरद पवारांनी म्हटलंय.
2014 मध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदे नाव आलं होतं मात्र अंतर्गत विरोधामुळे शिंदेंनी पद स्वीकारलं नाही. संजय राऊत, देसाई अशा 2-3 नेत्यांनी उध्दव ठाकरेंच्या नावासाठी आग्रह शरद पवारांकडे धरला. 2004 ला संधी असूनही राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही, या अजित पवारांच्या आक्षेपावरही शरद पवारांनी उत्तर दिलं. त्यावेळी अजित पवार ज्युनिअर होते. भुजबळ आणि इतर नेत्यांचं नाव चर्चेत होतं. पण तसं केलं असतं तर पक्ष त्यावेळीच फुटला असता असं शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचं नव्हतं की तुमच्याकडे उमेद्वार नव्हता. आर आर आबा, विजय सिंह मोहिते पाटील, अजित दादा होते उमेदवार नव्हता की आहे त्याला मुख्यमंत्री करायचं नव्हतं हे पवारांनी महाराष्ट्राला सांगावं सरकार पाडेपर्यंत भूमिका कुणी घेतल्या. उध्दव ठाकरेंना अनुभव नसताना मुख्यमंत्री केलं. सुप्रिया सुळेंची राजकीय कारकीर्द सुरु झाली नव्हती म्हणून 2004 मुख्यमंत्रीचा उमेद्वार नव्हता.
दरम्यान 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरत होते. अखेरीस मी त्यांना तुम्ही एकटे जावू शकतात. ते भावनिक झाल्याचंही पवारांनी सांगितलंय. अजित पवारांच्या आरोपांवर बोलताना आपण कधीही सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये भेद केला नाही. दादांना उपमुख्यमंत्रीपद, मंत्रिपद, विरोधी पक्षनेतेपद आणि विधीमंडळ पक्षनेतेपद देवूनही अजित पवारांची ओरड निरर्थक असल्याचं पवार म्हणाले. दरम्यान निवडणुकीचा शेवटचा टप्पा असताना शरद पवारांनी ही मुलाखत दिली. सत्तासंघर्षातल्या विविध गोष्टींवर भाष्य करताना सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्याच बाजूनं उभा असल्याचं सांगून ठाकरेंचं कौतुकही केलंय.