Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : बुरखा वाटपावरून सुषमा अंधारे यामिनी जाधव, पाहा व्हिडीओ

| Updated on: Sep 13, 2024 | 10:33 PM

शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधवांनी भायखळ्यात बुरखा वाटप केलं. त्यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री शिंदेंनाच टार्गेट केलं. आता अंधारेंच्या टीकेला यामिनी जाधवांनीही प्रत्युत्तर दिलंय.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : बुरखा वाटपावरून सुषमा अंधारे यामिनी जाधव, पाहा व्हिडीओ
Follow us on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधवांनी, बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेतला. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुषमा अंधारे आणि अंबादास दानवे तुटून पडले. लोकसभा निवडणुकीत स्वत:च्याच मुस्लिम बहुल मतदारसंघात 46 हजार मतांनी मागे राहिले. त्यामुळं मुस्लिमांची आठवण झाली अशी टीका, अंधारेंनी केली होती. त्यावर अंधारेंना किती दिवस शिवसेनेत येऊन झालेत, असा जोरदार समाचार यामिनी जाधवांनी घेतला. हिरव्या मतांसाठी लांगूलचालन करणार नाही असं म्हणत होते, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. तर अंधारेंना शिवसेनेत येवून किती वर्षे झाली, बाळासाहेबांना काय बोलल्या होत्या? असा सवाल यामिनी जाधव यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत जे झालं ते विधानसभा निवडणुकीत टाळण्यासाठी यामिनी जाधवांनी मुस्लिम महिलांना जवळ करण्याचा प्रयत्न केल्याची टीका सुरु झालीय. लोकसभेत पराभूत झाल्यानंच बुरखे आणि टोप्या वाटप झाल्याचं अंबादास दानवेही म्हणालेत. लोकसभेत हारले म्हणून बुरखे, टोप्या वाटत आहात, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. त्यांच्या टीकेला यामिनी जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं. मनपात यशवंत जाधव जुलूससाठी 2 कोटीची तरतूद करायचे तेव्हा का गप्प ? असा सवाल यामिनी जाधव यांनी अंबादास दानवे यांना उद्देशून केला.

पाहा व्हिडीओ:-

भायखळ्यात यामिनी जाधव बुरखा वाटप करताना दिसल्या आणि त्यानंतर तात्काळ भाजपकडून आशिष शेलारांनी विरोध केला. बुरखा वाटप भाजपला मान्य नाही, असं शेलार म्हणाले होते. बुरखा वाटप भाजपला मान्य नाही, आम्ही निषेध करतो, असं आशिष शेलार म्हणाले. त्यावर यामिनी जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं. भारतात राहणारे सर्व हिंदू, होय आम्ही मुस्लिम धर्मावरही प्रेम करतो, असं यामिनी जाधव म्हणाल्या.

विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे मतदारसंघातील समीकरणानुसार स्थानिक नेत्यांकडून कार्यक्रम हाती घेतले जाता आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधवांनी बुरखा वाटप केलं. मात्र विरोधकांसह भाजपच्याही टीकेचा सामना जाधवांना करावा लागला.