Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : लोकसभा निवडणुकीआधी संभाजीनगरमध्ये राडा आणि हाणामारी, पाहा व्हिडीओ

| Updated on: May 11, 2024 | 9:02 PM

छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दोन्ही शिवसेनेचे शिवसैनिक आमनेसामने आले. शिवसेनेच्या दोन्ही गटाची रॅली क्रांती चौकात येताच अक्षरश: राडा झाला. हा राडा नेमका कशामुळे झाला? यावरील पाहा टीव्ही9 मराठीचा स्पेश रिपोर्ट.

Follow us on

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान दोन दिवसांवर आलं आहे. महाराष्ट्राती लक्ष असणाऱ्या लढतींपैकी छत्रपती संभाजीनगरकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मात्र मोठा राडा झालेला पाहायला मिळाला. छ.संभाजीनगरमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राडा झालाच. महायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंनी रॅली काढली. मात्र क्रांती चौकात दोघांचेही कार्यकर्ते आमनेसामने आले आणि अक्षरश: हाणामारी झाली.

भर दुपारी संभाजीनगरच्या क्रांती चौकात, अशी धक्काबुक्की सुरु होती. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांचीही चांगलीच कसरत झाली. ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनीही, रॅलीत दारुच्या बाटल्या दाखवत, भुमरेंना डिवचलं…भिंगरी…भिंगरी म्हणत दानवे दारुरच्या बाटल्या दाखवत होते.

संदीपान भुमरेंच्या रॅलीत मनसेचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. अंबादास दानवे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी, मनसे घे दोनशे अशा घोषणा दिल्या. दानवे हातात 200 रुपये घेवून घोषणा देत होते. त्यामुळं पुन्हा ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्तेही आमनेसामने आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत आहे. MIMचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील शिंदे गटाकडून संदीपान भुमरे आणि ठाकरे गटाकडून चंद्रकात खैरे मैदानात आहेत. तर खैरे आणि भुमरेंच्या भांडणात मी जिंकणार असं जलील म्हणतायत.

दरम्यान, येत्या 13 तारखेला मतदान पार पडल्यावर तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. संदीपान भुमरेंकडे शिंदे हे सरकारमधील मंत्रीपदाचीही जबाबदारी आहे.